Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री-देवराई वनप्रकल्पातील वारंवार जळीतकांड प्रकरणाची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यासाठी  सत्याग्रह आंदोलन

बीड प्रतिनिधी - बीड तालुक्यातील पालवन शिवारातील सह्याद्री-देवराई वनप्रकल्पात गेल्यावर्षभरात 3 वेळा जळीतकांडाच्या घटना घडल्या असून वनप्रकल्पातील

तब्बल ४८ तासात चोरीला गेलेले २२ लॅपटाॅप पोलिसांनी शोधले | LOKNews24
आयफोन हॅकिंग प्रकरणी केंद्राकडून तपास सुरू
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; अल्पवयीन युवक बालसुधारगृहात

बीड प्रतिनिधी – बीड तालुक्यातील पालवन शिवारातील सह्याद्री-देवराई वनप्रकल्पात गेल्यावर्षभरात 3 वेळा जळीतकांडाच्या घटना घडल्या असून वनप्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणातील पुरावे नष्ट करून भ्रष्टाचार दडपण्याचाच प्रयत्न असुन संबधित प्रकरणात वारंवार भ्रष्टाचार निर्मूलन समिती तसेच सामाजिक संघटनांनी निवेदन, तक्रारी तसेच आंदोलनानंतर सुद्धा जिल्हा नियोजन समिती, जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ आधिकारी, वनविभागातील आधिकारी व ठेकेदार यांनी संगनमतानेच हा प्रकार घडवुन आणल्याचा संशय असून संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर भारतीय वनसंरक्षक 1927 नुसार अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.3 एप्रिल सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाप्रशासनाच्या निषेधार्थ काळे चष्मे घालून आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अभिमान खरसाडे, रामनाथ खोड, अजय  सरवदे, शेख युनुस च-हाटकर, मिलिंद सरपते, शेख मुस्ताक, शेख मुबीन, बलभीम उबाळे, विलास गवळी, आरूण खेमाडे आदि. सहभागी होते. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले.
बीड शहरापासुन जवळच पालवणच्या डोंगरात 207 हेक्टर क्षेत्रात  सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून वनविभागाच्या मदतीने सह्याद्री-देवराई वनप्रकल्प विकसित करण्यात आला. दीड लाखाहून आधिक वृक्षाची लागवड करण्यात आली ,सिनेपटकथा लेखक अरविंद जगताप यांचाही मोलाचा वाटा आहे. जगातील पहिले वृक्षसंमेल्लन याच ठिकाणी झाले. परीसरात ट्रेकिंग, फिरायला, वाढदिवस साजरा करायला नागरिक येतात.  याठिकाणी गेल्या वर्षभरात पहिली घटना दि.12फेब्रुवारी 2022 रोजी आग लागली त्यानंतर दुसरी घटना दि.10 मार्च 2022 रोजी गवळवाडी  रोपवन आगीत वन भस्मसात आणि तिसरी घटना दि.25 मार्च 2023 रोजी अशा 3 जळीतकांड घटना वर्षभरात घडलेल्या आहेत.  शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत 2019 मध्ये पिंपळवाडी रस्त्यावर गवळवाडी येथे 25 हेक्टर क्षेत्रात रोपवन उभारले. दि.09 मार्च रोजी फॉ.सर्व्हे नंबर 378 रोपवनक्षेत्र गवळवाडी परीसरात आग लागून 10 एकर क्षेत्रातील 4-5 हजार झाडे जळुन खाक झाली.  बीड जिल्ह्यातील विविध विभागातील वनविभाग अंतर्गत वारंवार आगीच्या घटना घडत असुन संबधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वात दि.14 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन व दि.04 एप्रिल 2022 रोजी विभागीय आयुक्त औरंगाबाद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणेबाबत निवेदनावरून समिक्षा चंद्राकर उप आयुक्त (रोहयो)औरंगाबाद यांनी दि.25 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी बीड यांना  डॉ.गणेश ढवळे यांच्या दि.10 मार्च 2022 रोजीच्या बीड जिल्ह्यातील वनप्रकल्पातील वारंवार जळीतकांड  प्रकरणात चौकशी व कारवाई करण्यात यावी निवेदनाच्या अनुषंगानेच अर्जदार व अर्जातील मुद्यांबाबत आधिकारी/कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो)यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून प्रकरणात तोडगा काढावा व अर्जदार यांना आमरण उपोषण पासुन परावृत्त करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ कार्यालयास पाठवावे असे आदेश पत्रक जा.क्र 2022/रोहयो/जन -6 /कावि-152 नुसार देण्यात आले होते परंतु वर्ष होऊन सुद्धा अद्याप बैठक आयोजित करण्यात आलीच नाही. सह्याद्री-देवराई परीसरात कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी 3 वर्षापुर्वी  डोकेवाडा तलावावरून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.त्याचे टेंडर मंजूर झाले परंतु नंतर त्याचे  पुढे काय झाले??,पाईपलाईनचे काम रखडलेलेच आहे, विशेष म्हणजे एका गावच्या सार्वजनिक पाईपलाईनचे पाणी वापरण्याची मुभा असतानाही टॅकर लावले आहेत. याची सविस्तर चौकशी होणे गरजेचे आहे.कायमस्वरूपी चौकीदार असणे गरजेचे आहे. वनविभागातील आधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असुन वनपाल, वनसंरक्षक आगीच्या लागलेल्या घटनांचा पंचनामा करण्याव्यतिरिक्त ईकडे फिरकत नाहीत. वनविभागातील आधिका-यांकडुन आवश्यक उपाययोजनांबाबत ऊदासिनता दिसुन येते. वनविभागातील कर्मचार्‍यांची गस्त आवश्यक आहे.  वनविभागातील गैरव्यवहार प्रकरणात चौकशी व कारवाईसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने करण्यात आली. दि. दि 1 मार्च 2021 रोजी   जळीतकांड प्रकरणात दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन,  दि.21 फेब्रुवारी 2022 रोजीअन्नत्यागआंदोलन, दि.28 फेब्रुवारी 2022 रोजी  वृक्षदिंडी  आंदोलन  ,दि.14 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, दि 7 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिमाग की बत्ती जलाओ आंदोलन आदि आंदोलन करण्यात आली. परंतु जिल्हाप्रशासन व वनविभागातील आधिका-यांत कोणतीही सुधारणा दिसुन आली नाही.  दि. 20 डिसेंबर 2021 रोजी राधाबिनोद शर्मा जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती बीड यांनी  उप आयुक्त नियोजन विभागीय आयुक्त औरंगाबाद तसेच जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशावरून तसेच अध्यक्ष जाणता राजा प्रतिष्ठान बीड ,शिवशंकर भोसले युवक जिल्हाध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे सेना प्रतिष्ठान बीड यांनी वनविभागातील विविध योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणातील तक्रारीवरून वन विभागातील योजनांची चौकशी करून दोषींवर खुलाषा करण्यात यावा याबाबत पत्रक जा.क्र जिनिस/जिवायो/पत्र/21-22 / 14867 नुसार वन विभागास विविध योजनेंतर्गत देण्यात येणा-या निधीबाबत सन 2019-20 पासुन ते सन 2020-21 पर्यंत संदर्भीय पत्रान्वये विविध तक्रारी या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत संदर्भ क्रमांक (1) च्या पत्रान्वये या तक्रारीबाबत वनविभागाकडील (प्रादेशिक) 2019-20 योजनांकरीता वितरीत निधीबाबत तक्रार प्राप्त झालेली होती. संदर्भ 2 च्या पत्रान्वये या तक्रारीबाबत विभागीय वन आधिकारी (प्रादेशिक)यांचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्याबाबत कळवले होते त्यानुसार संदर्भ 3 अन्वये सन 2019-20 मधील पुनर्विनियोजन उपलब्ध करून दिलेल्या रूपये 10 कोटी 84 लक्ष बाबत सविस्तर चौकशी अहवाल करून मा. उपआयुक्त (नियोजन)विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना सादर केलेला आहे. संदर्भ क्रमांक 4, 6,7,9,10 अन्वये सन 2019 -20 व 2020-21 मध्ये वनविभागास दिलेल्या निधीबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.   तथापि सदर बाबतीत तसेच सन 2020-21 मध्ये वितरीत निधीबाबत पुन:श्च तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याअनुषंगानेच विभागीय वन आधिकारी (प्रादेशिक),विभागीय वन आधिकारी (वन्यजीव),विभागीय वन आधिकारी (सामाजिक वनीकरण) यांच्याकडील योजनेंतर्गत केलेल्या कामांची व खर्चाचा सविस्तर अहवाल व खुलासा सादर करण्याबाबत आपणास यापूर्वीच कळवले आहे त्यानुसार आपल्या विभागाकडील योजनेस सन 2019-20 ते 2020 -21 पर्यंत प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांची आणि त्यावर झालेल्या खर्चाचा कामनिहाय छायाचित्रासह सविस्तर अहवाल (खुलाश्यासह)या कार्यालयास तात्काळ सादर करावा. याबाबत आपणांस यापुर्वी वारंवार कळविण्यात आलेले आहे. सदर अहवाल करण्याबाबत आपणास दोन वेळा स्मरणपत्र पाठवुनही आपण अद्याप अहवाल सादर केलेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी पुन:श्च कळविण्यात येते की  आपल्या कार्यालयाचा सविस्तर अहवाल (प्रशासकीय मान्यता, कामाचे फोटो, खुलासा व ईतर अनुषंगिक बाबीसह)मला समक्ष भेटुन तात्काळ सादर करावा असे नमूद केले आहे. परंतु अद्याप अहवाल सादर केल्याचे दिसून येत नसुन संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.

COMMENTS