Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये सत्यभामा बांगर यांना अटक

बँकेतील 13 कोटींचा अपहारप्रकरणी कारवाई

बीड : जिल्ह्यातील पाटोदा येथील महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राम

भाजपने काँग्रेससोबत जाण्यास मजबूर केले – उद्धव ठाकरे
एकरी 100 टन ऊसाचे उत्पादन घेणार्‍या महिला शेतकर्‍यांचा सन्मान होणार : संगीता साळुंखे
आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा ’कराड गौरव पुरस्कार सौ. पुष्पा कुलकर्णी यांना जाहीर
बीडमधील बँकेत १३ कोटींचा अपहार; सत्यभामा बांगर यांना अटक - पुरोगामी  विचाराचे एकमत

बीड : जिल्ह्यातील पाटोदा येथील महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना पाटोदा पोलिसांनी अटक केली आहे. 13 कोटींच्या अपहार प्रकरणी ही अटक करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सन 2011 ते 2015 कालावधी दरम्यान महात्मा फुले अर्बन बँकेमध्ये 13 कोटींचा बनावट दस्तावेज सादर करून सत्यभामा बांगर यांनी अपहार केल्याचा आरोप आहे. रामकृष्ण बांगर यांनी देखील पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना बाजार समितीची जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात देखील गुन्हा नोंद झाला होता. आता त्यांच्या पत्नी बँकेच्या अपहार प्रकरणात अडचणीत आल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

COMMENTS