पुणे : येथील बहुचर्चित सतीश वाघ हत्येचा अखेर उलगडा झाला असून, याप्रकरणी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच अनैतिक संबंधातून संतोष यांच्या हत्य
पुणे : येथील बहुचर्चित सतीश वाघ हत्येचा अखेर उलगडा झाला असून, याप्रकरणी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच अनैतिक संबंधातून संतोष यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अक्षय जवळकर हा सतीष वाघ यांचा भाडेकरू होता. आणि मोहिनी यांच्यात 2013 पासून अनैतिक संबध सुरू झाल्याचे बोलले जात आहे. दोघांच्या अनैतिक संबंधाची वाच्यता जवळच्या लोकांनी पोलिसांकडे केली होती, अशी माहिती समोर येत आहे. यामुळेच या खूनाचा उलगडा झाला. संतोष वाघ यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिस वाघ यांच्या घरी गेले असता तेव्हा त्या मुलांसोबत रडताना दिसून आल्या. पतीच्या निधनाचे दु:ख झाल्याचे नाटक त्यांनी चांगल्या प्रकारे केले. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर वाघ यांच्या जवळच्या व्यक्तींनी मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यातील अनैतिक संबंधांची वाच्यता त्यांच्याजवळ केली. याच दरम्यान, अक्षय हा देखील गायब झाला असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर पोलिसांनी अक्षयला अटक करून त्याची चौकशी केली असता सत्य समोर आले. आरोपी अक्षयने पोलिस चौकशीत मोहिनी वाघ हिने आपल्याला संतोष यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी मोहिनी वाघ हिला 25 डिसेंबर रोजी अटक केली.
COMMENTS