Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदयनराजेंच्या गाण्यावर सातारकर फिदा

सातारा प्रतिनिधी - यावेळी उदयनराजे भोसले यांनी सातारकरांसाठी गाणं गायलं. 'तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी हे गाणं गायलं' असं सांगत उ

नगर तालुक्यातील 44 गावांच्या पाणी योजनेची वीज तोडली
मुंबईत लोकलमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म
धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी

सातारा प्रतिनिधी – यावेळी उदयनराजे भोसले यांनी सातारकरांसाठी गाणं गायलं. ‘तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी हे गाणं गायलं’ असं सांगत उदयनराजे यांनी मैदानावरील सर्वांची मनं जिंकली. ‘तेरे बिना जिया जाये ना’ हे गाणं उदयनराजे यांनी गायले. माझ्या चाहत्यांसाठी मी हे गाणं गायलं आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करता त्याप्रेमापोटी हे गाणं गायलं आहे, असे सांगताच उदयनराजे यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष साजरा केला. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात उदयनराजेंनी पुन्हा एकदा कॉलर उडवून चाहत्यांची मनं जिंकली. साताऱ्यातल्या गांधी मैदानात शरीर सौष्ठव स्पर्धा झाली. त्यात उदयनराजे यांनी प्रेक्षकांना अभिवादन केल्यावर कॉलर उडवली.  उदयनराजे यांनी कॉलर उडवल्यावर त्यांनी अनोखी पोझही दिली. कार्यक्रमाला उदयनराजेंचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. माझं वय मी सांगणार नाही, कोणी विचारलं तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही असा इशाराही त्यांनी दिला.   गांधी मैदान येथे घेतलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावत पुन्हा एकदा कॉलर उडवल्याने याचीच जोरदार चर्चा आहे.

COMMENTS