Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा ते पुणे जुना कात्रज घाटात एकेरी वाहतूक

पुणे प्रतिनिधी - पुणे कात्रज-शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळ

झोपु प्रकल्पात ‘पुनर्वसना’ वरील स्थगिती उठवा
देशमुखांचा राजीनामा; वळसे नवे गृहमंत्री ; सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार
खेलो इंडिया युवा स्पर्धेत तिसर्‍यांदा विजेतापदाचा मानकरी

पुणे प्रतिनिधी – पुणे कात्रज-शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.आदेशानुसार आजपासून 31 डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ही वाहतूक आता नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरु असल्याने दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता होती. हा धोका लक्षात घेत प्रशासनाने या उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार 3 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करुन साताराकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.पुणे मोटार वाहन कायदा 1988 व गृह विभागाच्या 19 मे 1990च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी केले आहेत.

COMMENTS