Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सराफावर कोयत्याने वार

पुणे: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याचे उघडकीस आले आहे. लष्कर भागात शनिवारी रात्री सराफ व्यावसायिक

बालगृहातून अल्पवयीन मुलाचं अपहरण… | DAINIK LOKMNTHAN
महाराष्ट्र कुस्ती संघातील वाद पुन्हा चव्हाटयावर
महिला सहकाऱ्याला केसांना पकडून ओढत नेलं, रस्त्यावरच बेदम मारहाण

पुणे: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार केल्याचे उघडकीस आले आहे. लष्कर भागात शनिवारी रात्री सराफ व्यावसायिकावर दोघांनी कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. आईचा अपमान केल्याने सराफावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. युवराज अनिल गोरखे (वय 24, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साथीदार सार्थक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय विमलचंद मेहता (वय 38, रा. कुमार कॅसल सोसायटी, कॉन्व्हेंट स्ट्रीट, लष्कर) असे जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. याबाबत मेहता यांचा भाऊ मनोज (39) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरखे याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची आई मेहता यांच्याकडे कामाला होती. विजय आणि गोरखेची आई यांच्यात वाद झाला होता. विजय यांनी आईवर चोरीचा आरोप केला होता. आईचा अपमान केल्याने गोरखे चिडला होता.

COMMENTS