Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शारदा शैक्षणिक संकुलाची उज्वल यशाची परंपरा कायम

राहाता ः येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलाचा एस.एस.सी .बोर्ड मार्च 2024 चा उत्कृष्ट निकाल लागला असून शारदा विद्या मंदिर चा निकाल 85.3

पाथर्डी तालुक्यातील श्री विवेकानंद विद्यामंदिरने मारली बाजी
मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू
जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचा विवेक कोल्हेंना पाठिंबा

राहाता ः येथील रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलाचा एस.एस.सी .बोर्ड मार्च 2024 चा उत्कृष्ट निकाल लागला असून शारदा विद्या मंदिर चा निकाल 85.34 टक्के इतका लागला आहे. एकूण परीक्षेत 191 विद्यार्थी बसले होते पैकी 36 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली आहे व 55 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवलेले आहे यामध्ये प्रथम क्रमांक सोनवणे ओम दत्तात्रेय 92.40 टक्के गुण मिळवले आहे तसेच द्वितीय क्रमांक सोनवणे प्रथम शरद 90.20 टक्के गुण मिळाले आहेत व तृतीय क्रमांक कुलकर्णी समर्थ संतोष याने 89.80 टक्के गुण मिळवले आहेत तर विद्यालयातील पवार यश गणेश या विद्यार्थ्याने टेक्निकल या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.
              त्याचप्रमाणे शारदा कन्या विद्यालयाचा निकाल 90.76% लागला आहे परीक्षेस 184 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 49 विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता श्रेणी प्राप्त केली आहे तर 62 विद्यार्थिनींनी प्रथम श्रेणी मिळवली आहे त्यामध्ये कुमारी यादव सृष्टी अनिल हिने 94.80% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे तर कुमारी कोकाटे मनस्वी बबन हिने 93% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे तसेच कुमारी मते तेजस्विनी परसराम व सोनवणे ईश्‍वरी सुरेश यांनी 92.20% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल विद्यालयात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक  रमेश  शिंदे, संकुलाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे  व कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे उपप्राचार्य रामभाऊ गमे प्रा. शरद गमे, राजकुमार साळवे यांनी  गुणवान विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या उत्तुंग यशाबद्दल राहाता पंचक्रोशीतील सर्व पालक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्कूल कमिटी व शिक्षक वृंद यांचे कडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS