बीड प्रतिनिधी - शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजनांनी शिक्षणाकरिता भांडीकुंडी विका उपाशी पोटी राहा पण आपल्या पाल्यास शिक्षण द्या व अंधश्रद्धा, आळ
बीड प्रतिनिधी – शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजनांनी शिक्षणाकरिता भांडीकुंडी विका उपाशी पोटी राहा पण आपल्या पाल्यास शिक्षण द्या व अंधश्रद्धा, आळस,नशा पाणी मादक पदार्थ व कर्जबाजारीपणा पासून देवाचे नवस फेडणे, यापासून दूर राहण्याचा व माणसाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे.
स्वतः ग्रामस्वच्छता करून परिसर स्वच्छतेचे महत्व सागनारे, माणसातच देव आहे हे आपल्या अनमोल कीर्तनातून, बोली भाषेत बहुजन समाजाला समजावून सांगणारे संतश्रेष्ठ संत गाडगेबाबा यांना नागसेन बुद्ध विहार धानोरा रोड बीड येथे वाचाल तर वाचाल या फिरते मोफत वाचनाल्यातर्फे विहार परिसरातील विद्यार्थ्यांकरिता 50 पुस्तकांचा संच वाचनालयाचे डी.जि वानखेडे यांनी प्रमुख उपस्थित असलेले सरस्वती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.उत्तमराव पवार व सेवानिवृत्त जिल्हा प्रबंधक एलआयसी यु.एस. वाघमारे यांच्या हस्ते वितरित करण्यासाठी बौद्धाचार्य डी. एन.पोटभरे यांना सुपूर्त केला व संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या संचामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, संत गाडगेबाबा, डॉ एपीजे अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद , व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय अशा विविध विषयावरील पुस्तकांचा समावेश आहे. सर्वप्रथम तथागत महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पमाला अर्पण करून महिला मंडळाच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुनील कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संत गाडगेबाबांनी त्यांना मिळालेल्या दानातून धर्मशाळा बांधल्या व गोरगरिबांच्या शिक्षणाच्या करिता शिक्षणाचे कार्य करणाऱ्या धर्मदाय संस्थांना वस्तीगृह किंवा शाळेकरीता दिल्या. त्यांनी त्यांच्या जीवनात समाज सुधारण्याकरता अनिष्ट रूढी परंपरा पासून दूर राहण्याकरिता केलेल्या अनेक कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम.भोले यांनी अभिवादन प्रसंगी सांगितली की विहारे ही संस्कार केंद्रे व्हावीत तसेच समाज बांधवात विचारविनिमय होण्याची केंद्रे व्हावीत असे स्पष्ट केले. याप्रसंगी वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचना लायाच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर माहिती वाचनायाचे डी.जी.वानखेडे यांनी दिली. मुलांच्या हातात चांगली पुस्तके वाचन संस्कृती वाढवण्याकरता हे वाचनालय प्रयत्न करीत आहे. त्यास बीड शहरातील विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमास कॅप्टन राजाभाऊ आठवले, के. एस. वाघमारे,अँड.तेजस वडमारे, विहारांच्या महिला मंडळाच्या केशर कांबळे, सुनिता शिंदे, विमल डोळस, अंजली वीर, निकिता वीर, सानवी वीर, विद्या कोरडे, शालीन वीर, सुनिता शिंदे, प्रांजल वीर व, रवी सोनवणे, के बी गायकवाड, श्रीरंग डोळस, एम एल गायकवाड, सम्यक विद्यागर, दादासाहेब गायकवाड, एम एल गायकवाड, दादासाहेब जाधव,व परिसरातील बहुसंख्य महिला, पुरुष बालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी.एम. विद्याधर यांनी व्यक्त केले.सरणातयणे कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS