Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीचा साई परिक्रमा देखावा ठरला रामनवमीचे आकर्षण  

कोपरगाव प्रतिनिधी ः श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणार्‍या मुंबादेवी तरुण मंडळाच्या श्री साई गाव पालखीचे विधिवत पूजन सहकारमहर्षी

क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा स्मृतीस्तंभ उभारणार : निरंजन डावखरे
तक्रारदाराकडील पुराव्यामुळे आरोपीचा अटकपूर्व फेटाळला
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

कोपरगाव प्रतिनिधी ः श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणार्‍या मुंबादेवी तरुण मंडळाच्या श्री साई गाव पालखीचे विधिवत पूजन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखी पूजनानंतर त्यांनी श्री साई पालखीत सहभागी होऊन साईभक्तांचा उत्साह वाढविला.तसेच साईभक्तांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
शिर्डी येथे श्री साई गाव पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर समृद्धी महामार्ग सर्कल येथे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सुगंधित दूध वाटप करण्यात आले. या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानने उभारलेला साई परिक्रमेचा नयनरम्य देखावा खास आकर्षण ठरला.हजारो लहान-मोठ्या नागरिकांना या देखाव्याने भुरळ घातली होती. कोपरगावहून नगर-मनमाड महामार्गावरून शिर्डीला निघालेल्या श्री साई गाव पालखीसोबत हजारो स्री-पुरुष भाविक-भक्त पायी चालत होते. साई परिक्रमेसाठी शिर्डीला निघालेल्या या भाविकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर समृद्धी महामार्ग सर्कल येथे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सुगंधित दुधाचे वाटप करून सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाविकांसोबत नृत्य करत त्यांचा उत्साह वाढवला. शिर्डी येथे श्री साई परिक्रमेसाठी व पालखी सोहळ्यासाठी गेलेल्या हजारो भाविकांनी या सुगंधित दुधाचा आस्वाद घेतला आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक, संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, नगरसेवक, भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS