कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित, शिवऊर्जा यात्रेस समस्त शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मागच्या वर्षी हा विचार आला की आपण डीजे न लावता, वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुका न काढता खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविले गेले पाहिजेत या हेतूने काहीतरी आपण करावं आणि म्हणून ही संकल्पना मनामध्ये आली की दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा मिळण्यासाठी गडकिल्ल्यावर युवकांसमवेत जाऊन त्या ठिकाणचा इतिहास जाणून घ्यावा. त्या ठिकाणी कशाप्रकारे संघर्षमय वातावरणामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी तसेच मावळ्यांनी योगदान दिले हे समजून घ्यावे. म्हणून प्रथम वर्षी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ला येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून,दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम किल्ला असणाऱ्या स्वराज्याची राजधानी रायगडावरती आलो प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले. युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित “शिवऊर्जा यात्रा किल्ले रायगड” मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी या शिवऊर्जा यात्रेमध्ये कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांमधील ज्येष्ठांसह युवक शिवभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. इतिहासाचे अभ्यासक व्याख्याते प्रा. गणेश लोळगे म्हणाले की, प्रत्येक माणसासाठी आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. या संघर्षाला सामोरे जाताना खऱ्या अर्थाने जिथे आपल्याला मोठी ऊर्जा मिळते, ते ऊर्जेचे आणि निष्ठेचे ठिकाण म्हणजे रायगड होय. आजचा काळ फार महत्त्वाचा आहे. ज्या काळामध्ये तरुणांना योग्य दिशा दाखवून चांगल्या पद्धतीने शिवविचार पेरणे ही आजच्या काळाची गरज आहे. छत्रपती शिवरायांचा एक-एक विचार सातासमुद्रापार पोहोचलेला दिसतो आहे. तेव्हा तुमच्या-आमच्यासारख्यांना हा विचार ऊर्जा देऊ लागतो, असे ते यावेळी म्हणाले.

कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित, शिवऊर्जा यात्रेस समस्त शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मागच्या वर्षी हा विचार आला की आपण डीजे न लावता, वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुका न काढता खऱ्या अर्थाने महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविले गेले पाहिजेत या हेतूने काहीतरी आपण करावं आणि म्हणून ही संकल्पना मनामध्ये आली की दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची प्रेरणा मिळण्यासाठी गडकिल्ल्यावर युवकांसमवेत जाऊन त्या ठिकाणचा इतिहास जाणून घ्यावा. त्या ठिकाणी कशाप्रकारे संघर्षमय वातावरणामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांनी तसेच मावळ्यांनी योगदान दिले हे समजून घ्यावे. म्हणून प्रथम वर्षी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी शिवनेरी किल्ला येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून,दुसऱ्या वर्षी जगातील सर्वोत्तम किल्ला असणाऱ्या स्वराज्याची राजधानी रायगडावरती आलो प्रतिपादन विवेक कोल्हे यांनी केले.
युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित “शिवऊर्जा यात्रा किल्ले रायगड” मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी या शिवऊर्जा यात्रेमध्ये कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांमधील ज्येष्ठांसह युवक शिवभक्त मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
इतिहासाचे अभ्यासक व्याख्याते प्रा. गणेश लोळगे म्हणाले की, प्रत्येक माणसासाठी आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. या संघर्षाला सामोरे जाताना खऱ्या अर्थाने जिथे आपल्याला मोठी ऊर्जा मिळते, ते ऊर्जेचे आणि निष्ठेचे ठिकाण म्हणजे रायगड होय. आजचा काळ फार महत्त्वाचा आहे. ज्या काळामध्ये तरुणांना योग्य दिशा दाखवून चांगल्या पद्धतीने शिवविचार पेरणे ही आजच्या काळाची गरज आहे. छत्रपती शिवरायांचा एक-एक विचार सातासमुद्रापार पोहोचलेला दिसतो आहे. तेव्हा तुमच्या-आमच्यासारख्यांना हा विचार ऊर्जा देऊ लागतो, असे ते यावेळी म्हणाले.

COMMENTS