Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या अनुष्का उंडेचा नवा विक्रम

सीबीएसई दहावीत मिळवले 99 टक्के गुण

कोपरगाव तालुका ः सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनॅशनने (सीबीएसई-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) फेब्रुवारी-मार्च, 2024 मध्ये घेतलेल्या इ. 10 वीच्या प

पढेगांवला कृषि संजीवणी मेळावा संपन्न
समृद्धी महामार्गामुळे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न पूर्ण – स्नेहलता कोल्हे
महादजी शिंदे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

कोपरगाव तालुका ः सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एक्झामिनॅशनने (सीबीएसई-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) फेब्रुवारी-मार्च, 2024 मध्ये घेतलेल्या इ. 10 वीच्या परीक्षांचे निकाल जाहिर केले असून यात संजीवनी अकॅडमीच्या अनुष्का सचिन उंडे हिने 99 टक्के गुण मिळवून कोपरगाव तालुक्यात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. तसेच तिने संस्कृत व समाजशास्त्र या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले. या परीक्षेत 30 विद्यार्थ्यांनी 90 टक्यांपेक्षा अधिक तर 60 विद्यार्थ्यांनी 80 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन एक विक्रम प्रस्थापित केला, अशी माहिती संजीवनी अकॅडमीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.           

पत्रकात पुढे म्हटले आहे की, चार्वी रमेश कोठारी हीने 98 टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांक मिळविला. आरती अनिल कारवा हीने 97 टक्के गुण मिळवुन तिसर्‍या  क्रमांकाची मानकरी ठरली. वरूण समिर डहाके व शांभवी  अनिल देशपांडे यांनी प्रत्येकी 96 टक्के गुण मिळवुन चौथा क्रमांक मिळविला. परीमल दत्तात्रय आदिक, कृतिका मयुर पटेल आणि शरीन सिराज जलिश  अहमद यांनी प्रत्येकी 95 टक्के गुण मिळवुन पाचवा क्रमांक मिळविला. श्रावणी आण्णासाहेब थोरात हीने मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून नवा कीर्तिमान प्रस्थापित केला. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, प्राचार्या शैला झुंजारराव व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांनी दर्जा व गुणवत्तेशी  कधीही तडजोड करायची नाही, अशी शिकवण  दिली. त्यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक  तत्वांनुसार शाळेची  वाटचाल सुरू आहे. म्हणुनच संजीवनी अकॅडमीचे विद्यार्थी देश  पातळीवर विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे जिंकुण आणतात. आपले विद्यार्थी बहुआयामी घडावेत, या दृष्टीने  स्कूलचे प्रयत्न असतात आणि त्याला यशही मिळत आहे. सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करून स्कूलच्या दर्जाची उंची वाढविली आहे. या परीक्षेतील उत्तुंग यश  हे आम्ही स्व. शंकरराव  कोल्हे यांच्या पवित्र स्मृतिस समर्पित करीत आहोत.
 डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स

COMMENTS