Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कलावंत प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी संजय शिंदे

श्रीगोंदा /प्रतिनिधी ः प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश अवचार सर तसेच महिला आघाडी अध्यक्ष संगीता ताई

संपदा संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव होण्याचा मार्ग मोकळा ; वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
वाकडीत एक हजार विद्यार्थांना बुट आणि सॉक्सचे वाटप
ऐसाम शिलेदारची बास्केटबॉल तपश्‍चर्या कौतुकास्पद – पो.नि. डोईफोडे

श्रीगोंदा /प्रतिनिधी ः प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश अवचार सर तसेच महिला आघाडी अध्यक्ष संगीता ताई ठोंबरे, उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सोनावणे आणि नाशिक जिल्हाध्यक्ष झुंबर भाऊ भांड यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा तालुक्याचे कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये  बेलवंडी कोठार गावचे रहिवासी असलेले जय मल्हार जागरण गोंधळ पार्टीचे सर्वेसर्वा संजय शिंदे गोंधळी यांची श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तालुक्याच्या उपाध्यक्षपदी श्री देविदास ढवळे, संघटक पदी श्री नामदेव ननवरे,नवनाथ आळेकर,महिला  आघाडी शोभा शिंदे, सल्लागार पदी भाऊसाहेब शिंदे,नानासाहेब  झराड, चिटणीस पदी मारुती शिंदे, सचिव पदी-अभिजीत शिंदे,दिनकर गोरे,मधुकर बोरुडे यांच्या निवडी करण्यात आल्या.त्यांना तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते, मा.आमदार राहुल जगताप, घनशाम शेलार,अनुराधा नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा,नगराध्यक्ष मनोहर पोटे, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते,पत्रकार-नितीन रोही, मा.नगरसेवक दादासाहेब औटी यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे, नूतन  पदाधिकार्‍यांचे श्रीगोंदा तालुक्या सह सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

COMMENTS