Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांना संसदीय नेतेपदावरून हटवले

शिंदे गटाची कारवाई ः संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष बहुमताच्या आधारे शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेकडून आक्रमक हालचाली करण्यात

काँग्रेस नेते थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन महोत्सव
अकोल्यात दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
भाजपआघाडीतून आणखी एक पक्ष बाहेर

मुंबई/प्रतिनिधी ः केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष बहुमताच्या आधारे शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेकडून आक्रमक हालचाली करण्यात येत असून, संसदेतील संसदीय नेतेपदावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्याचबरोबर संसदीय नेतेपदावर शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे.
एकीकडे संजय राऊत शिंदे गटावर निशाणा साधत असतानाच शिंदे गटाचे आमदारही राऊतांवर टीका करताना दिसत आहेत. त्यामुळेच शिंदे गट आणि ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच संजय राऊत यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊत यांना हटवले आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे. राऊतांना पदावरुन हटवून एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. यांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहितीही दिली होती. त्यानुसार, ही निवड करण्यात आली आहे.

COMMENTS