Homeताज्या बातम्यासंपादकीय

संजय राऊत : सूडाच्या नाट्याचे बळी !

  महाराष्ट्रात कुणी कल्पनाही केली नव्हती, एवढा टोकाचा राजकीय बदल घडवून आणत, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या पंगतीला शिवसेनेल

सरन्यायाधीश ट्रोल होतात तेव्हा……..!
नवरात्र उत्सव धर्माचा नव्हे, बहुजनांचा!
एकनाथ शिंदे : इव्हेंट मॅनेजमेंट न करणारा एकमेव नेते !

  महाराष्ट्रात कुणी कल्पनाही केली नव्हती, एवढा टोकाचा राजकीय बदल घडवून आणत, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या पंगतीला शिवसेनेला आणून बसविण्याच्या कार्याचे खरे शिल्पकार म्हणविले जाणारे नेते म्हणजे संजय राऊत. संजय राऊत यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणूकांनंतर महाराष्ट्राचे सर्वात जेष्ठ राजकीय नेते असणारे शरद पवार यांच्याशी चर्चांच्या फेऱ्या घडवत, महाराष्ट्रात अखेर काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती घडवून आणत, १०५ आमदार निवडून आणलेल्या भाजपाला सत्तेच्या बाहेर बसविले. एव्हढंच नव्हे, तर, राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे खेचून आणले. मात्र, जशीही महाविकास आघाडी ने सत्ता स्थापन केली; तसे महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना सीबीआय आणि ईडी च्या रडारवर आणले. त्या नाट्याचा पहिला बळी अर्थातच राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ठरले. राज्याच्या गृहमंत्र्याविरोधात त्यांच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी आरोप करणे, महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलं. भाजपला १०५ आमदार जिंकूनही राज्याच्या सत्तेवर विराजमान होता आले नाही. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे शिल्पकार बनण्याचे श्रेय शरद पवार बरोबर स्वतःकडेही घेतले. परंतु, त्यांच्या या कृतीमुळे महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना त्यांच्यासह तुरुंगवासाची हवा ही पहावी लागली. कारण २५ वर्ष युतीत राहून भाजपला वाढण्यासाठी शिवसेनेची प्रत्यक्ष-प्रत्यक्ष मदत झाली होती; त्या मदतीचा ओघच संजय राऊत यांच्या कृतीने उद्ध्वस्त झाला होता! त्यामुळे सुडाच्या नात्याचे बळी ते ठरणारच होते! अर्थात, महाविकास आघाडी साकारल्यानंतर संजय राऊत यांच्या लेखनाचं जे स्वरूप महाराष्ट्राला पाहता आलं, त्यात फुले-शाहू-आंबेडकर विचारधारा मानणाऱ्या परंपरागत विचारवंत, लेखक किंवा पत्रकार यांच्याही लेखणीला धार नसेल; एवढी तीव्रता त्यांच्या लेखनात आली! किंबहुना, कोरोना काळामधील त्यांचा सर्वाधिक गाजलेला लेख म्हणजे “सर्वात आधी पळ काढला तो देवांनी” या लेखातून त्यांनी कोरोना काळामध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला सावरण्याची भूमिका कशी बजावली आणि प्रत्यक्ष देव त्या मदतीला कुठेच मैदानात दिसले नाही, हा त्यांचा लेख महाराष्ट्राने डोक्यावर घेतला! दिवसेंदिवस ते महाराष्ट्राच्या पुरोगामी विचार परंपरेचे पाईक होत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मात्र, याच काळात त्यांच्या पत्राचाळीचे प्रकरण ही उफाळून आले आणि त्यांना तुरुंगवासात बंदिस्त व्हावे लागले! परंतु, उद्धव ठाकरे यांची साथ न सोडता, ते कायम राहिले आणि त्याची फलश्रुती म्हणून सध्याच्या इंडिया आघाडीच्या राष्ट्रीय समितीच्या सदस्य पदी ही त्यांची नियुक्ती झाली. अर्थात संजय राऊत यांची खरी किमया किंवा खरी शक्ती ही पत्रकारितेच्या लेखनापेक्षाही बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दरचनेला त्यांनी जे लिखित स्वरूप दिले, किंबहुना, बाळासाहेब ठाकरे जे बोलतील ते सामना’त प्रत्यक्ष कसे असू शकेल, याचा लेखनाचा त्यांनी केलेला प्रचंड प्रपंच, ही त्यांची सर्वात मोठी शक्ती राहिली.  त्याची फलश्रुती म्हणजे त्यांना शिवसेनेच्या मुखपत्राचे आज पावेतो असलेलं कार्यकारी संपादक  आणि त्याचबरोबर दोन वेळा मिळालेली खासदारकी!  आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची महाराष्ट्रामध्ये त्यांनी पेललेली जबाबदारी, या सगळ्या गोष्टी कुतुहलासारखे आहे. तरीही संजय राऊत यांचे २०१९ पूर्वीचे लेखन आणि २०१९ नंतरचे लेखन जर आपण पाहिलं तर, त्यामध्ये दोन विरुद्ध दिशेची टोक आहेत! एकेकाळी मुस्लीम समुदायाचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला पाहिजे, या बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला त्यांनी दुजोरा दिला होता. त्याचप्रमाणे अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी प्रखर हिंदुत्ववादाची जी भूमिका घेतली होती, त्याला २०१९ नंतर त्यांनी दिलेली तिलांजली आणि घेतलेले पूरक स्वरूप, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संजय राऊत यांच्या रूपाने सर्वाधिक ठळक उदाहरण म्हणून एक इतिहास बनले आहे, यात शंका नाही.

COMMENTS