Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते ः केसरकर

मुंबई : संजय राऊत हे राज्यसभेत आमच्या मतावर निवडून गेले आहेत. त्यांना थोडी तरी नैतिकीची जाणीव असेल तर त्यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा

कोपरगाव तालुक्यातून दहावीत परीक्षेत समृद्धी शेळके द्वितीय      
अल्पबचत योजनांच्या व्याजदरावरून वाद का?
आशा सेविकांनी बंद केले कोरोना सर्वेक्षण ; कोरोना काळातील कामाचा मोबदला मिळावा व शासकीय सेवेत समावून घेण्याची मागणी

मुंबई : संजय राऊत हे राज्यसभेत आमच्या मतावर निवडून गेले आहेत. त्यांना थोडी तरी नैतिकीची जाणीव असेल तर त्यांनी राज्यसभेच्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून यावं. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारच मतदान करणार आहेत. त्यामुळे राऊत यांनी हा प्रयोग करून पाहावच, असं आव्हान देतानाच आमच्या मतांवर निवडून आले आणि आमच्याविरोधातच बोलतात. राऊत यांना बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय? असा संतप्त सवाल शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.

केसरकर माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पक्षाचं चिन्हं आपल्याच गटाला मिळणार असल्याचा दावाही केला. पक्ष चिन्हावर आमचाच हक्क आहे. त्यामुळे गुलाल उधळणार की नाही हा भाग नाहीये. नेत्यांना किती मतदान मिळाले हे निवडणूक आयोग पाहतो. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत किती मतदान झाले हे पाहिलं जातं. किती सदस्य निवडून आले हे पाहिलं जातं. आमच्यासोबत ऐंशी ते नव्वद टक्के आमदार आणि खासदार आहेत. त्यामुळे निकाल आमच्याच बाजूने लागेल. आमचाच विजय होईल, असा विश्‍वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. पक्षाची विचारधारा कुणाबरोबर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विचारधारा आमच्यासोबत आहे. त्यामुळे हा आमचा हक्क आहे तो आम्हाला निवडणूक आयोग देईल हा मला विश्‍वास, असंही ते म्हणाले.बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली हे आम्हाला नेहमीच वाटतं. संजय राऊत यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेलंय. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलाय, असा दावाही त्यांनी केला.

COMMENTS