Homeताज्या बातम्याशहरं

सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचा राजीनामा

सांगली / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी आपला राजीनामा आज भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे

जयंत पाटील राजकारणातील नारदमुनी : सुरज चव्हाण
श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे दिवसाढवळ्या चोरी
मुंबई पालिकेचा आश्‍वासनांचा अर्थसंकल्प

सांगली / प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी आपला राजीनामा आज भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे सादर केला. त्यांचा राजीनामा ‘विहित नमुना’ पत्रावर येणार का, याविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतू, त्यांनी नमुना पत्रासह लेटर हेडवरही राजीनामा सादर करून पक्षाचा आदेश पाळला.
जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आज दुपारी राजीनामा सादर केला. त्यांनी लेटर हेड आणि विहित नमुना अशा दोन्ही पध्दतीने राजीनामा दिला आहे. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती सुनिता पवार, जगन्नाथ माळी यांचा राजीनामा बुधवारी कोअर कमिटीच्या बैठकीवेळी मिळेल, असे अपेक्षित आहे. सभापती प्रमोद शेंडगे यांनी या आधी राजीनामा दिला आहे. भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक बुधवारी होणार आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यावेळी जिल्ह्यातील सगळेच नेते उपस्थित असतील. त्यांच्यासमोर जिल्हा परिषदेतील राजीनामे आणि पुढील भूमिकेविषयी चर्चा केली जाईल. त्यात शिक्कामोर्तब झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या सभापतींचे राजीनामे मंजूर करून घेतील आणि त्यानंतर अध्यक्षांचा राजीनामा सादर केला जाईल.

COMMENTS