आ. सदाभाऊ खोत यांची अधिवेशनात मागणीसांगली / प्रतिनिधी : सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीज बिलांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आ

आ. सदाभाऊ खोत यांची अधिवेशनात मागणी
सांगली / प्रतिनिधी : सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीज बिलांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून महावितरणच्या नावे दिले जाणारे धनादेश नेहमीप्रमाणे अधिकृत भरणा केंद्रात भरले जात होते. मात्र, हे धनादेश वापरून महापालिकेच्या वीज बिलांऐवजी खासगी व्यक्ती, संस्था किंवा फर्मची बिले भरली जात आहेत. सांगली महापालिकेत वीज बिल घोटाळा झाला आहे यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अधिवेशनात आ. सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, हा घोटाळा एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत सुरु होता. या कालावधीतील वीज बिल व धनादेशाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सुमारे 1.28 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांत गुन्हा ही दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणात केवळ इतकाच अपहार झाला नाही. त्यामागे आणखी मोठा भ्रष्टाचार दडलेला आहे. हे चार्टर्ड अकौंटंटमार्फत करण्यात आलेल्या स्वतंत्र ऑडिटमधून उघड झाले आहे. सखोल लेखापरीक्षणातून, महापालिकेच्या वीज बिलांच्या गैरव्यवहारातून तब्बल 3.45 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशीची प्रक्रिया एवढ्या वेळ का लावते आहे, असा सवाल उपस्थित करत दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली. सांगली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्यावरही गंभीर आरोप केले.
या अधिकार्यांच्या कार्यकाळात वीज बिल घोटाळा, स्मशान दफनभूमी घोटाळा घडला. बांधकाम परवाने देण्याच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत. विज बिल घोटाळा ही चौकशीय समितीत महानगरपालिकेचे उपायुक्त असलेले वैभव साबळे हे काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पकडले गेले आहेत. हे प्रकरण तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे शुभम गुप्ता यांनाही सहआरोपी म्हणून चौकशीच्या कक्षेत आणावे आणि त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करावी.

COMMENTS