संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त  !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त !

मोहन भागवत हे आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्यावर गांगरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धर्म संसदेत केले गेलेले वक्तव्यं ही आर‌एस‌एस ची भूमिका नाही वा ते आमचे ह

‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य : छगन भुजबळ
लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत 18 जागांसाठी 54 उमेदवार रिंगणात
बुऱ्हानगर मंदिरातील भगत पुजारी फैलावतात कोरोनाचा प्रादुर्भाव बुऱ्हानगर ग्रामस्थांचा आरोप

मोहन भागवत हे आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्यावर गांगरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. धर्म संसदेत केले गेलेले वक्तव्यं ही आर‌एस‌एस ची भूमिका नाही वा ते आमचे हिंदुत्त्व नाही, अशी घुमजाव करणारे वक्तव्य त्यांनी केले आहे. हिंदुत्व हे आता संघ परिवाराच्या अंगलट येऊ लागलेय. शिवसेना देखील भाजप-संघापासून लांब होण्यामागे हिंदुत्व हेच कारण ठरले आहे. त्याचे विश्लेषण सेनेचे पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या भाषेत केले ते एका वाक्यात असे म्हटले की, ” आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही.”  या वाक्यात जे सामावले आहे. छत्तीसगड मध्ये नुकत्याच झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण नावाच्या एका साधूने जी बेताल वक्तव्य केली, त्याविरोधात देशभरात प्रचंड आवाज उठवला गेला. संघाला यातून एक महत्वपूर्ण सबक मिळाली की, संघाचे हिंदूत्व या देशात चालणारे नाही. परंतु, असे असले तरी कोलांट उड्या मारीत राहणे हा संघ परिवाराचा खाक्या आहे. या खाक्याला जागणारेच वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या म्हणण्यानुसार संविधानातील व्यवस्या हेच आमचे हिंदुत्व आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी राष्ट्रीय एकतेसाठी समता आवश्यक नाही; असे सांगत विविधतेत एकता राखली जाते, असे वक्तव्य करून भलत्याच कोलांट उड्या घेतल्या आहेत. खरेतर भारतीय संविधान हे सर्वांना समता बहाल करते. समता हे एक तत्त्व आहे. जी सापेक्ष संकल्पना आहे. नुकतेच एका बाजूला तेलंगणा चे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी संविधानाविषयी एक बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याविरोधात देशात गदारोळ उठला. यावरून देखील संघाला एक संदेश गेला की, संविधान विरोधी वक्तव्यं खपवून घेतली जात नाही. चंद्रशेखर राव हे थेट संघाचे नसले तरी संघाच्या कोअर जात असणाऱ्यातून ते असल्याने त्यांच्या वक्तव्यामागे संघ आहे, असा अर्थ निघू शकतो. त्यामुळे मोहन भागवत यांनी संविधान हेच आपले हिंदूत्व सांगून एकाचवेळी संविधानाला शरणही येतात आणि संवैधानिक तत्वांशी छेडछाड देखील करतात. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावरचा अब्राह्मणी म्हणजे बहुजन भारताचा विश्वास आणखी कमी झाला. एकंदरीत, संघ हे समजून चुकला की, आपला हिंदूत्ववाद हा केवळ पंधरा टक्क्यांच्या हिताचा असल्याने तो भारतात आता यापुढील काळात चालणार नाही. अर्थात, मोहन भागवत यांचे द्विधा वक्तव्यामागे पाच राज्य आणि त्यातील सर्वात महत्त्वाचे उत्तर प्रदेशातील निवडणूका या खूप महत्वाच्या ठरल्या आहेत. भागवत यांच्या वक्तव्यातून हे देखील समोर येते की, उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता असली तरी तेथे हिंदूत्व मान्य केले जात नाही. यामुळे, भागवत यांनी संविधान पूरक वक्तव्य करून संघाच्या आत्मवंचनेचे पाऊल पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेशात राजकीयदृष्ट्या सर्व जातीसमुह जागृत झाल्याने तेथे संघाचा राष्ट्रवाद चालेनासा झालाय. सर्व जाती विचारताहेत की, सत्तेत आमचा वाटा काय? तुमचे हिंदुत्व आणि तथाकथित राष्ट्रवाद तुमच्या जवळ ठेवा, आम्हाला सत्तेत थेट प्रतिनिधित्व काय, हा प्रश्न विचारला जातो आहे. दुसऱ्या बाजूला ज्या बहुजन वादातून ओबीसी जाती जागृत झाल्या त्यांची जागृती ही राजकीय सौदेबाजीत अडकली आहे. प्रत्येक जात आपला राजकीय वाटा मागत आहे. परंतु, यातून बहुजनवादाचा सामाजिक पराभव होत असल्याचेही दिसते. मोहन भागवत यांना हे वास्तव ठळकपणे दिसत आहे. संघाचे हिंदूत्व आणि बहुजनवादाचे सामाजिक तत्व हे दोन्ही उत्तर प्रदेशात कोरोना सारखा श्वास अडखळून पडण्याच्या बेतात दिसते आहे. आता, या देशात संविधानाला अभिप्रेत असणारी समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि न्याय ही तत्व प्रत्याक्षात रूजवणं किंवा अंमलात आणणं एवढाच पर्याय सत्ताधाऱ्यांना पर्याय आहे, अन्यथा भारतीय लोक सत्तावर्गाला कायमचा धडा शिकवतील!

COMMENTS