Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

कायदा व सुव्यवस्थेला अबाधीत ठेवण्याचे आव्हान

संगमनेर ः कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या काही घटना गेल्या महिनाभरापासून सातत्याने संगमनेरमध्ये घडत आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडता

उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती करणारा कोल्हे कारखाना राज्यातील पहिला : बिपीनदादा कोल्हे
आ. आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ’बकरी ईदच्या’ शुभेच्छा
राजकिय जोडे बाजूला काढून ठेवा म्हणणारेच राजकिय टोमणे मारताहेत- प्रा.सुभाष शिंदे

संगमनेर ः कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या काही घटना गेल्या महिनाभरापासून सातत्याने संगमनेरमध्ये घडत आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडताना दिसते. यामागील कारणांचा शोध घेत प्रशासनाने आता कारवायांचा धडाका लावला आहे. पोलिसांनी नागरिकांच्या अर्जांची दखल घेत प्रचंड फौज फाट्यासह पोलिसी कारवाईचा मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. आरटीओला मदतीला घेत शहरात वाहनांची तपासणी मोहीम राबविली. दिवसभर शहरातील जोर्वे नाका, दिल्ली नाका तसेच बस स्थानक अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार 64 वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या.
सकाळपासून विविध कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये पायी पेट्रोलिंग, नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आल्या. आरटीओ विभागाच्यावतीने देखील अवैध वाहनांवर कारवाया करण्यात आल्या त्यात रिक्षांवर कारवाई करण्याचे प्रमाण अधिक आहे. कागदपत्रे नसणार्‍या 15 रिक्षा जप्त करण्यात आल्या असून अन्य 21 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 1 लाख 72 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील रस्त्यावर धावणार्‍या रिक्षा मोठ्या प्रमाणात गायब झाल्या होत्या. याशिवाय संगमनेर शहरातील जुना महामार्ग, मुख्य बाजारपेठ या भागामध्ये ज्या दुकानदारांनी दुकानाच्या पुढील भागात अतिक्रमण केलेले आढळून आले त्या ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली. त्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. एकूण 35 दुकानदारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102,117 खाली कारवाई करण्यात आली असून या सर्व कारवायांचे प्रस्ताव न्यायालयामध्ये पाठविण्यात आले आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना ग्रामीण भागातील नागरिकांनी तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जामध्ये जोर्वे, सुकेवाडी, निळवंडे, पिंपरणे, कनोली, वडगाव पान, कोल्हेवाडी इत्यादी भागात विनापरवाना रिक्षा व वाहने फिरत असतात त्यावर आरटीओ मार्फत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच संगमनेर शहर व परिसरात अशा विनापरवाना रिक्षा या अवैध वाळू वाहतूक, गोमांस वाहतुकीसाठी वापरल्या जातात अशी तक्रार देखील सातत्याने प्राप्त होत होत्या.  यातून भविष्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा रोष होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी आरटीओ विभागाच्या पथकाकडून संगमनेर शहरात विशेषतः बस स्थानक ते ज्ञानमाता विद्यालय, तीन बत्ती चौक ते रायतेवाडी फाटा, कोल्हेवाडी रोड, जोर्वे रोड, जमजम कॉलनी, भारत नगर, रहेमत नगर, मदिना नगर इत्यादी भागात कारवाई करावी आणि या कारवाई करता मदतीला आवश्यक ते मनुष्यबळ हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल असे पत्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांना दिले आहे.

COMMENTS