Sangamner : संगमनेर ‘सिंघमला’ अखेर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिला न्याय (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : संगमनेर ‘सिंघमला’ अखेर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिला न्याय (Video)

आपल्या विशेष शैलीतून अनेक गुन्ह्यांचा तपास लावणारे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील या

अत्याधुनिक ग्रेडेड मशीनद्वारे शहरातील रस्त्यांचे कामे दर्जेदार होणार – आ.संग्राम जगताप
आई भवानी माता कोरोनाचे संकट टळू दे-महापौर शेंडगे
उड्डाणपुलाच्या कामासाठी शासकीय जमीन कमी संपादन करत खाजगी जमीन जास्त संपादन करत असल्याचा आरोप

आपल्या विशेष शैलीतून अनेक गुन्ह्यांचा तपास लावणारे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागे घेतली आहे . माळी यांची संगमनेर येथून शिर्डी पोलिस स्टेशनला बदली केली आहे. त्यामुळे अखेर संगमनेरचे सिंघम म्हणून ओळखले जाणारे  पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांना जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी न्याय दिला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक देविदास माळी यांच्यावर चार महिन्यांपूर्वी निलंबनाची कारवाई केली होती . माळी यांनी संगमनेर येथे कार्यरत असताना अनेक छोट्या-मोठ्या गुन्ह्यांचा तपास लावला होता. तसेच कोरोना काळात दिवस रात्र न बघता नागरिकांच्या सेवेसाठी ते 24 तास तत्पर असायचे या काळात त्यांना देखील कोरोणा झाला होता परंतु त्यानंतर पंधरा दिवसात पुन्हा एकदा कामावर रुजू झाले होते. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई चुकीचे असून त्यांना पुन्हा एकदा कामावर घ्यावे . अशी मागणी अनेक विविध संघटनांनी केली होती आज अखेर या मागणीला न्याय मिळाला असून संगमनेरकरांनी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे आभार मानले आहे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी ज्याप्रकारे संगमनेर मध्ये कर्तबगारीने काम केले त्याच प्रकारे शिर्डी येथे देखील आपली चमकदार कामगिरी करून दाखवतील अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS