Sangamner : शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणतात… मी कधी रेशनचे धान्य घेतलेले नाही…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणतात… मी कधी रेशनचे धान्य घेतलेले नाही…

बोगस शिधापत्रिका चा वापर करून प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांच्

Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार
Sangamner : कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधनात्मक जनजागृती | LokNews24
Sangamner : संगमनेर शहरातील चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु होणार (Video)

बोगस शिधापत्रिका चा वापर करून प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप संगमनेर भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांच्यावर केला आहे.

यावर खुलासा देताना शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी म्हणाले की, मी स्वतः शासनाच्या कोणत्याही रेशन दुकानात जाऊन धान्य घेतलेले नाही . किंवा त्या ठिकाणी माझे थम ही दिलेले नाही. मी एक गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे पूर्वीच्या काळी जे रेशन कार्ड होते. त्यामध्ये रेशन घेतले जात होते. पण आता परिस्थिती बदलली असून कोरोना काळात मी स्वतः तसेच  शिवसेना व शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यामतून अनेक गोर गरीब कुटुंबांना व वस्तीला किराणा किटचे वाटप केले आहे. म्हणून मला रेशन कार्ड ची गरज नाही. माझ्यावर झालेले आरोप  आहेत त्या बाबत मी खुलासा केला आहे. तसेच आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख  रावसाहेब नाना खेवरे यांना याबाबत मी सांगितले असून त्यांनी आता पुढील दोन महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकी कडे लक्ष देण्याचे आदेश आम्हाला दिले आहेत. त्यामुळे सध्या माझे लक्ष फक्त आणि फक्त शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकडे पूर्णपणे लक्ष देत आहे असे शेवटी अमर कतारी यांनी सांगितले.

COMMENTS