Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाद्य वादन स्पर्धेत संदीप हिरवेचे यश

श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी तालवाद्य तबला वादन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगर येथे उपाध्यापक म्हणून कार्यरत असलेले संदीप हिरवे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेतील यशामुळे त्यांच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संदीप हिरवे यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा शिर्के-पाचपुते यांच्यासह सर्व शिक्षक, मित्रपरिवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच केंद्रप्रमुख हनुमंत भुकन, विस्ताराधिकारी निळकंठ बोरुडे आणि गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनीही संदीप हिरवे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तीस वर्षांनी रंगला मित्र-मैत्रिणींचा मेळावा
अर्धवट महामार्ग कामामुळे ग्रामस्थ संतप्त; आंदोलन तीव्र
कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख

श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित अधिकारी व कर्मचारी तालवाद्य तबला वादन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा शुगर येथे उपाध्यापक म्हणून कार्यरत असलेले संदीप हिरवे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

या स्पर्धेतील यशामुळे त्यांच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संदीप हिरवे यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा शिर्के-पाचपुते यांच्यासह सर्व शिक्षक, मित्रपरिवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.

तसेच केंद्रप्रमुख हनुमंत भुकन, विस्ताराधिकारी निळकंठ बोरुडे आणि गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी यांनीही संदीप हिरवे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS