कोपरगाव तालुका ः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूलचा इ. 10 वीचा निकाल 100 टक्के लागला असून, यात कृष्णा संदिप गायकवाड
कोपरगाव तालुका ः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी सैनिकी स्कूलचा इ. 10 वीचा निकाल 100 टक्के लागला असून, यात कृष्णा संदिप गायकवाड याने शेकडा 93. 80 टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकाविला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने नुकतेच हे निकाल जाहिर केले. यात संजीवनी सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून स्कूलचा दर्जा व गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे, अशी माहिती स्कूलने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पियुष कचेश्वर गुंड हा 92. 20 टक्के गुण मिळवुन दुसर्या क्रमांकाचा मानकरी ठरला. सार्थक नानासाहेब मढवई याने 91 टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक मिळविला. गौरव शिवराम पाटील याने 90. 80 व श्रीपाद महेंद्र काटकर याने 90. 60 टक्के गुण मिळवुन अनुक्रमे चौथा व पाचवा गुणानुक्रम प्राप्त केला. एकुण 45 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 35 विद्यार्थ्यांनी 80 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले तसेच वर्षभर शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाचे चीज केले. उर्वरीत 10 विद्यार्थ्यांनी 70 ते 79 टक्यांमध्ये गुण मिळविले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य कैलास दरेकर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.
COMMENTS