सोनई ः लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या मानाच्या अहिल्यादेवीनगर जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सोनई येथील पत्रकार संदीप दरंदले या
सोनई ः लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या मानाच्या अहिल्यादेवीनगर जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सोनई येथील पत्रकार संदीप दरंदले यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य यांच्या आदेशानुसार सोनई येथील पत्रकार संदिप दरंदले पाटील यांची एक वर्षा साठी निवड करण्यात आली आहे.संदिप दरंदले हे गेली पंधरा वर्षांपासून विविध राष्ट्रीय व स्थानिक दैनिकात पत्रकारिता करत आहेत.जिल्हातील पत्रकारांचे संघटन करून त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन उभारण्या साठी काम करणे. पत्रकार पेन्शन योजने बाबत काम करणे. पत्रकार हल्लाविरोधी कायदा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे. पत्रकार अधिस्वीकृती साठी काम करणे आदी बाबी मध्ये लोकशाही जिल्हा पत्रकार संघ जिल्ह्यात काम करणार असल्याचे लोकशाही पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष संदिप दरंदले म्हणाले.
COMMENTS