Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू माफियांकडून तहसीलदारांंस शिवीगाळ व धमकी

कोपरगाव शहर ः कोपरगांव येथील तहसीलदार भोसले यांनी अवैधरित्या वाळू घेऊन जाणार्‍या एक वाहनास पकडे असता त्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडून तहसीलद

रेमडीसिविरच्या बाटलीत चक्क भरले सलाइनचे पाणी ; नीचपणाचा कळस, कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ
संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे
विद्युत मोटार आणि केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल

कोपरगाव शहर ः कोपरगांव येथील तहसीलदार भोसले यांनी अवैधरित्या वाळू घेऊन जाणार्‍या एक वाहनास पकडे असता त्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडून तहसीलदार यांना शिवीगाळ व दमबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
24 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक प्रतिबंध घालून त्यावर कारवाई करण्याकामे पथक गस्तीवर असताना त्यांना कुंभारी फॉरेस्ट मधून रोडला हिंगणे कडे जातांना टाटा कंपनीचा टेम्पो त्यात वाळू भरून जात असताना त्याला अडवून अवैध रित्या वाळू वाहतूक करतांना आढळून आल्याने कारवाई करणे कमी कोपरगांव तहसील कार्यालय येथे घेऊन आले असता.आरोपी यांनी त्यांच्या साथीदार यांना बोलून पथका सोबत हुज्जत घालत  तुम्ही पैसे घेत नाही का,तुम्ही आमचा वाळू वाहतूक करणार टेम्पो का तहसील कार्यालयात आणला तो लगेच सोडवा नाहीतर तुम्हाला इथे नोकरी करून देणार नाही  अशी धमकी देत दमबाजी केली.त्याच बरोबर पथकांनी आपले वरिष्ठ अधिकारी तहसीलदार भोसले यांना संपर्क साधून कोपरगांव तहसील कार्यालय येथे बोलावले असता तहसीलदार यांना देखील वाळू माफियांनी शिवीगाळ करत दमबाजी केली. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटना स्थळी धाव घेत गर्दी पांगवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार भोसले आणि पथकाने पोलीस ठाण्यात रात्री उशिरा वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला असून त्या प्रमाणे बाबासाहेब शिवाजी जाधव, अझर इस्मौद्दिने शेख, तुषार दीपक दळे यांच्याविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम 379,353,332,504,506 34 प्रमाणे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1980 प्रमाणे 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू माफियांविरुद्ध कारवाई करणार्‍या तहसीलदारांनाच शिवीगाळ व दमबाजी करण्यात येत असेल तर पोलीस प्रशासनाने याची गांभीर्यने दाखल घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे .

तहसील व महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन – संबंधित वाळू माफियांवर कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल झाला आहे  परंतु संबंधित आरोपीना पोलीस प्रशासनाने अटक केली नसून त्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथील नायब तहसीलदारासह तलाठी व संपूर्ण महसूल प्रशासनाने तहसील कार्यालयांच्या प्रेवशद्वारा समोर मंगळवारी अचानक पणे काम बंद आंदोलन पुकारत  संबंधित व सोबतच्या इतर सर्व आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

COMMENTS