पुणे : नागपूर-मुंबई असा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आल्यामुळे विदर्भातील जनतेचा प्रवास सोईस्कर होतांना दिसून येत आहे. मात्र समृद्धी महामार्
पुणे : नागपूर-मुंबई असा समृद्धी महामार्ग तयार करण्यात आल्यामुळे विदर्भातील जनतेचा प्रवास सोईस्कर होतांना दिसून येत आहे. मात्र समृद्धी महामार्ग आता पुण्याला जोडणार असल्यामुळे पुणे ते नागपूर असा प्रवास देखील लवकर होण्याची शक्यता आहे, त्यासाठी सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग पुण्याला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेला 53 किलोमीटरचा सहा पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासंदर्भातला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 7 हजार 515 कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-शिरूर-अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर पद्धतीने नव्या सहा पदरी उड्डाण मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. पुण्याजवळील केसनंद गावातून या उड्डाण मार्गाची सुरुवात होणार असून 53 किलोमीटरचा हा उड्डाणमार्ग शिरूरपर्यंत पोहचणार आहे. त्यासाठी 7515 कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र आता हा प्रस्तावित उड्डाणमार्ग पुढे अहमदनगर आणि तिथून पुढे छत्रपती संभाजी नागरमार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आणखी 2050 कोटी रुपये खर्च येणार असून एकूण खर्च 9565 रुपये इतका येणार आहे. या महामार्गाची एकूण लांबी 250 किलोमीटर इतकी असणार आहे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या सुधारित मार्गाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला होता. त्या प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे.
COMMENTS