Homeताज्या बातम्यादेश

सम्मेद शिखरप्रश्‍नी आणखी एका जैन मुनींचा देहत्याग

केंद्र सरकारची माघार मात्र झारखंड सरकारचा निर्णय प्रलंबित

जयपूर/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून जैन समाजाचे पवित्र धार्मिक स्थळ सम्मेद शिखरला या ठिकाणाला केंद्र सरकार आणि झारखंड सरकारने पर्यटनस्थळा

डेटा संकलनाअभावी पदोन्नतीत आरक्षण नाही : सर्वोच्च न्यायालय
समान नागरी कायद्यासाठी केंद्राला निर्देश द्या
राज्यात दुष्काळ जाहीर करा ः सुप्रिया सुळे

जयपूर/वृत्तसंस्था ः गेल्या काही दिवसांपासून जैन समाजाचे पवित्र धार्मिक स्थळ सम्मेद शिखरला या ठिकाणाला केंद्र सरकार आणि झारखंड सरकारने पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर केल्यानंतर जैन समाजाकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा रद्द करण्याकरिता  जयपूरमधल्या आणखी एका जैन मुनींनी प्राणत्याग केला आहे. गुरुवारी (5 जानेवारी) रात्री उशिरा जैन मुनी समर्थ सागर यांचे निधन झाले. गेल्या 4 दिवसांत प्राणत्याग केलेले हे दुसरे जैन मुनी आहेत. याबाबत माहिती मिळताच आज (शुक्रवार 6 जानेवारी) सकाळपासून जैन समुदायाच्या नागरिकांनी तिथल्या मंदिरात गर्दी केली.

केंद्र सरकारने गुरुवारी माघार घेत सम्मेद शिखरला पर्यटनस्थळाचा दर्जा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील केंद्र सरकारविरोधात रोष वाढतांना दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जयपूरच्या सांगानेरमधल्या संघीजी दिगंबर जैन मंदिरातले जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज यांनी 3 जानेवारीला देहत्याग केला. त्यानंतर 3 दिवसांपासून आमरण उपोषण करणार्‍या समर्थसागर या दुसर्‍या जैन मुनींनी गुरुवारी रात्री उशिरा प्राण सोडले. ही माहिती मिळताच शुक्रवार सकाळपासून जैन समाजाच्या नागरिकांनी मंदिरात गर्दी करायला सुरुवात केली. मंदिरापासून विद्याधर नगरपर्यंत संत समर्थसागर यांची डोल यात्रा काढण्यात आली. जोपर्यंत झारखंड सरकार सम्मेद शिखरला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करत नाही, तोपर्यंत जैन मुनी असेच बलिदान देत राहतील, असे जैन संत शशांक सागर यांनी सांगितले. जैन मुनी समर्थ सागर यांनी सम्मेद शिखर वाचवण्याकरता प्राणांचे बलिदान केले. ते कायम स्मरणात राहील, असे सांगानेरच्या दिगंबर जैन मंदिराचे मंत्री सुरेश कुमार जैन यांनी म्हटले आहे.  जैन मुनी समर्थ सागर महाराज आचार्य सुनील सागर महाराज यांचे शिष्य होते. गेल्या 3 दिवसांपासून ते उपोषण करत होते. केंद्र सरकारने गुरुवारी या संदर्भात 3 वर्षांपूर्वी जाहीर केलेला आदेश मागे घेतला; मात्र झारखंड सरकार याबाबत जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत जैन समाजाकडून हा विरोध सुरूच राहील, असे जैन समाजाचे म्हणणे आहे.

COMMENTS