Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर वानखेडे भाजपच्या वाटेवर

पत्नी क्रांतीसह रेशीमबागेतील हेडगेवर आणि गोळवलकरांच्या समाधीचे घेतले दर्शन

नागपूर/प्रतिनिधी ःधडाकेबाज कारवाया करून चर्चेत आलेले आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून वादग्रस्त ठरलेले अधिकारी आणि अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्

राज्यातील लम्पीबाधित ४ हजार ६०० जनावरे रोगमुक्त –पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती
‘लॉली’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला.
बुलढाण्यात भरधाव कारच्या धडकेत तीन महिला ठार

नागपूर/प्रतिनिधी ःधडाकेबाज कारवाया करून चर्चेत आलेले आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून वादग्रस्त ठरलेले अधिकारी आणि अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे आता भाजपवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडेकर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधल्या रेशीमबाग मुख्यालयात केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चेने जोर धरला आहे.
 मात्र, त्यांनी शाहरुखचा मुलगा आर्यन खानवर कारवाई केली आणि नव्या वादाला तोंड फुटले. आर्यन खानला जेलची हवा खावी लागली. मात्र, या प्रकरणी समीर वानखेडे यांनी आर्यनला जाणीवपूर्वक गोवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. शिवाय वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून आरक्षणाचा फायदा घेतला आणि एससी कोट्यातून आयआरएस झाले, असा आरोप केला. मात्र, समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले. आपले वडील हिंदू असून, आई मुस्लीम असल्याचे त्यांनी सांगितले. वानखेडे यांची मुंबईतून चेन्नई येथे महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर बदली करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण थंडबस्त्यात गेले. समीर वानखेडे यांनी पत्नी क्रांती रेडकर यांच्यासह नागपूरच्या रेशीमबागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला रविवारी भेट दिली. त्यांनी केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. त्यामुळे वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. आता ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. समीर वानखेडे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे समजते.वाशीम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर येथून ते निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा सुरूय. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सोबतच भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या वर्षी वाशीम जिल्ह्यात समीर वानखेडे आणि क्रांती रेडेकर यांनी जाहिरातबाजी करून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तेव्हापासूनच वानखेडे हे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा रंगली आहे.

मंगरूळपीरमधून विधानसभा लढण्यास इच्छूक – वानखेडे हे वाशीम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर येथून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही भेट घेतली. ते केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. बेधडक कारवायांमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे सतत चर्चेत असतात. आता त्यांच्या राजकीय प्रवेशांच्या चर्चांनी जोर धरला आहे.

COMMENTS