Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समीर सोमैया यांना ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स’ पुरस्कार 

कोपरगाव : गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक समीर सोमैया यांना जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘प्लिनिओ नस्तानी शुग

सर्व प्रभागांमध्ये बाल संरक्षण समिती स्थापन करावी
सडे गाव ते सडे फाटा रस्ता डांबरीकरण पूर्ण
दीपक सोनवणे गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम

कोपरगाव : गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक समीर सोमैया यांना जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. लंडन येथे नुकत्याच पार पडलेल्या ३४ व्या ‘आय.एस.ओ.’ आंतरराष्ट्रीय परिषदेत हा सन्मान देण्यात आला. डिसेंबर २०२५ मध्ये मिळालेला हा पुरस्कार भारताच्या साखर व जैवऊर्जा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला असून, हा मान पटकावणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.

 हा पुरस्कार केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित नसून, शाश्वत शेती, जैवऊर्जा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासासाठी समीर सोमैया यांनी दिलेल्या भरीव योगदानाची दखल म्हणून देण्यात आला आहे. ‘ग्रीन ग्रोथ’चा मंत्र देत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे आणि पर्यावरण रक्षणाचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जैवऊर्जेच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेली दिशा आज जागतिक स्तरावर कौतुकास्पद ठरत आहे.

 या यशाच्या पार्श्वभूमीवर साकरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीज प्रकल्पात भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कंपनीचे संचालक सुहास गोडगे यांनी समीर सोमैया यांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातूची भव्य मूर्ती प्रदान करून विशेष सत्कार केला. 

सत्काराला उत्तर देताना समीर सोमैया यांनी आपल्या उद्योग प्रवासाला उजाळा दिला. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी साखर उद्योग अडचणीत असताना केवळ साखरेवर अवलंबून न राहता ‘शुगर ज्यूस’ व ‘बी-हेवी मोलासेस’पासून इथेनॉल निर्मितीचा विचार मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्या वेळी अकल्पनीय वाटणारा हा मॉडेल आज जगभर स्वीकारला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्यासाठी कंपनीचे सीटीओ प्रवीण विभुते, जनरल मॅनेजर डॉ. गणेश गंडी, कोपरगाव तालुका साखर कामगार संघटनेचे पदाधिकारी, गोदावरी बायोरिफायनरीज कामगार पतपेढीचे पदाधिकारी तसेच अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS