Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संभाजी पाटील मुकनर

मुखेड प्रतिनिधी - राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी मुखेड तालुक्यातील उंद्री (प.मु.)गावचे भुमिपुत्र संभाजी पाटील मुकनर

पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई
आमदार डॉ. लहामटेंची भूमिका संदिग्ध
शिक्षक भरती घोटाळा आणि ऑपरेशन लोटस

मुखेड प्रतिनिधी – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी मुखेड तालुक्यातील उंद्री (प.मु.)गावचे भुमिपुत्र संभाजी पाटील मुकनर यांची निवड करण्यात आली आहे. निवडिबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आ. विक्रम काळे, रंणजीत नरोटे, अमर पाटील सह आदी मान्यवरांच्या हस्ते संभाजी पाटील मुकनर यांना मुंबई येथील पक्ष कार्यालयात नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.  यावेळी राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी, वसंतराव सुगावे, विश्वंभर पवार, कन्हैया कदम, सचिन जाधव, माधव पाटील चिंचाळे, रंजीत पाटील हिवराळे, माधव पाटील कदम, माधव पाटील बेंद्रेकर, अमोल पाटील कदम, शिवराज कागणे, जयभीम सोनकांबळे, बबलू देवकते, शिवाजी सलगर यांची उपस्थिती होती.निवडिबद्दल मुकनर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS