Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी श्रीगोंद्यात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

श्रीगोंदा : आठ महिन्यांपूर्वी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारील राजकोट येथील पुतळा एकाएकी कोसळून पडला. त्यात दोषी अ

*मराठा आरक्षणावर केंद्राची फेरविचार याचिका | सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
मुलांच्या कलाविष्कारातून समता इंटरनॅशनल स्कूलची उडान – गोविंद शिंदे
Ahmednagar : तहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणी वाढल्या…. कर्मचारी आक्रमक l LokNews24

श्रीगोंदा : आठ महिन्यांपूर्वी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारील राजकोट येथील पुतळा एकाएकी कोसळून पडला. त्यात दोषी असलेले मंत्री रविंद्र चव्हाण व इतर यांच्यावर तात्काळ कार्यवाही करणे बाबत श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी यांनी आंदोलन केले. संपूर्ण देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज  हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे. शिवरायांच्या नावावर  राजकिय पक्षांनी महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन केली आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोट वर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही बाब अत्यंत खेदजनक, संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी आहे.
या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडतो  हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली,कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी ही संभाजी ब्रिगेडची संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपणास मागणी आहे. आपण जर ही कारवाई लवकरात लवकर केली नाही तर संभाजी ब्रिगेड छत्रपती शिवरायांच्या या घोर अपमानाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठे आंदोलन उभे करेल. त्यामुळे आपण ताबडतोब दोषींवर कठोर कारवाई करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, तालुका अध्यक्ष शाम जरे,तालुका अध्यक्ष प्रसाद काटे, बहुजन संघटनेचे गोरख घोडके, लालूदादा मखरे, परीश जाधव, मयूर बनसोडे, मुकुंद सोनटक्के, अविनाश घोडके, प्रवीण शेलार, अक्षय लोखंडे, दिलीप लबडे चि. चैतन्य ज्ञानेश्‍वर आजबे, संदिप साळवे, नंदू दुर्गे, बाळू बोरुडे, संतोष गायकवाड, सुमित साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS