Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजार समित्यांच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड उतरणार

नूतन दक्षिण जिल्हाध्यक्षपदी परकाळे तर उत्तरेत पवार

अहमदनगर/प्रतिनिधी ः सध्या सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने संभाजी ब्रिगेड पक्ष उतरणा

कारखाने विक्री घोटाळ्याची ईडी-सीबीआय चौकशी करा ; शेतकरी कामगार महासंघाची सहकार परिषदेत मागणी
धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी
पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क ढीगभर घाण | पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ः सध्या सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने संभाजी ब्रिगेड पक्ष उतरणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सोमवारी येथे केली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी राजेश परकाळे व उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी पवार (श्रीरामपूर) यांच्या नियुक्तीची घोषणा डॉ. भानुसे यांनी केली. तसेच नगर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकांपैकी शेवगाव व नगर आणि श्रीरामपूर व राहुरी बाजार समित्यांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांशी जागा वाटप बोलणी सुरू आहे. ती समाधानकारक झाली नाही तर आम्ही स्वतंत्र लढणार आहोत, असे नूतन जिल्हाध्यक्ष परकाळे व पवार यांनी स्पष्ट केले.

संभाजी ब्रिगेड पक्षाच्या सदस्यांची बैठक येथील सुवर्णम प्राईड सभागृहात झाली. यावेळी पक्ष प्रवक्ते डॉ. भानुसे यांच्यासह संघटन सचिव डॉ. संदीप कडलग, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक विजयकुमार ठुबे व पोपटराव काळे, संभाजी ब्रिगेडचे उत्तर नगर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड़, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, विठ्ठल गुंजाळ व अन्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. भानुसे यांनी पक्षाची भूमिका मांडली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी संभाजी ब्रिगेड पक्षाची युती झाली आहे व त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत, असे स्पष्ट करून ते म्हणाले, शेतमालाला हमीभाव व दारूमुक्त गाव…असे घोषवाक्य घेऊन आम्ही ग्रामपंचायतीपासून, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, लोकसभा, विधानसभा व अन्य निवडणुका लढवणार आहोत. किती जागा मागायच्या, हे त्या-त्या निवडणुकीवर व स्थानिक वातावरणावर अवलंबून असेल. पण सर्व जागांची तयारीही आमची असणार आहे, असे सांगून ते म्हणाले, 1992मध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली आहे व तेव्हापासून जातीय व धार्मिक दंगली थांबवणे, संघटन व इतिहास पुनर्मांडणीवर भर दिला. भांडारकर इन्स्ट्यिूट व गडकरी पुतळा या प्रतीकात्मक केल्या आहेत. 2016मध्ये संभाजी ब्रिगेड पक्षाची स्थापना केली व आमची शिवसेनेशी युती आहे. आगामी सर्व निवडणुका आम्ही महाविकास आघाडीकडून लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशात हुकूमशाही सुरू/ देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असून, यामुळे देशाची अवस्था श्रीलंका व पाकिस्तानसारखी होण्यास वेळ लागणार नाही, असा दावा कडून डॉ. भानुसे म्हणाले, उद्योगांचे 68 हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे, महत्त्वाच्या अधिकारी पदावर कोणतीही पात्रता न पाहता नियुक्त्या होत आहेत, राहुल गांधींना शिक्षा ही हुकूमशाहीच आहे, शिंदे सरकार खोक्यांआधारे फोडाफोडी करीत आहे व दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, शेतीपिकाला हमी भाव नाही, बेरोजगारीचा गहन प्रश्‍न वाढत आहे, आऊटसोर्सिंग सगळीकडे सुरू आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांबद्दल बेदरकार असलेले व बेरोजगार युवकांच्या भावनांशी खेळणार्‍या केंद्र व राज्यातील सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मे महिन्यात नगरला मेळावा – संभाजी ब्रिगेडचे नूतन नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी याआधीही जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, नव्यांना संधी मिळावी म्हणून मधल्या काळात युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांचा फक्त कार्यकर्ता म्हणून काम केले. पण आता पुन्हा नव्या जोमाने व जोषाने संभाजी ब्रिगेड पक्षाची संघटनात्मक बांधणी जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून केली जाणार आहे. येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेणार आहे व दिवाळीच्या काळातही एक लाख कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सध्या शेवगाव, नगर, श्रीरामपूर व राहुरी अशा चार बाजार समित्यांमध्ये उमेदवार उतरवले असून, अन्य ठिकाणीही चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS