कोपरगाव प्रतिनिधी : केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची घोषणा केली. आज पर्यंत या उपक्रमांतर्गत झालेल
कोपरगाव प्रतिनिधी : केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची घोषणा केली. आज पर्यंत या उपक्रमांतर्गत झालेल्या अनेक उपक्रमांपैकी कोपरगावात संपन्न झालेल्या उपक्रमांपैकी समता परिवाराने आयोजित केलेला समता तिरंगा रॅलीचा एक उपक्रम असून हा उपक्रम या अभियानाचा सर्वोच्च बिंदू मानावा लागेल. या उपक्रमातून उद्याच्या पिढीला राष्ट्र प्रेमाचे बाळकडू मिळणार आहे. आजचा हा उपक्रम म्हणजे राष्ट्रप्रेमाचे संमेलन काकांनी या कोपरगाव शहरात भरविले. ७५ फूट उंचीवर तिरंगा फडकवून ध्वजारोहण केले नाही, तर राष्ट्र प्रेमाचा एक दिपस्तंभ उभारला आहे. ज्याप्रमाणे समुद्रात दीपस्तंभ दिशा देतो. त्याप्रमाणे उगवत्या पिढीला हा तिरंगा दीपस्तंभ प्रमाणे दिशा देत राहील.असे असे प्रतिपादन कोपरगाव तहसीलचे तहसीलदार श्री. विजय बोरुडे(Vijay Borude) यांनी केले. कोपरगाव शहरातील निवारा येथील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे(Mr. Dadappa Khandappa Koyte) विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ फूट उंच भव्य तिरंगा ध्वजारोहण तहसिलदार श्री. विजय बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांनी केले ते म्हणाले की, कोपरगाव शहरात तिरंगा रॅलीचे नियोजन समताने स्वीकारले आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट रोजी गांधी चौक ते निवाऱ्या पर्यंत तिरंगा ध्वज घेऊन जाण्याचे ठरविले त्यासाठी समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ स्वाती कोयटे(Mrs. Swati Koyte) यांच्या मार्गदर्शनाखाली समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांनी गांधी पुतळ्यापासून ते निवाऱ्यातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयापर्यंत स्वतःच्या खांद्यावर तिरंगा ध्वज घेऊन आले. या तिरंगा रॅलीतील समताच्या विद्यार्थ्यांचा सहभाग हा विशेष उल्लेखनीय आहे.
सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समता पतसंस्था(Samata Credit Union), समता इंटरनॅशनल स्कूल,(Samata International School,) कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ(Kopargaon Taluka Trade Federation) आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन(Kopargaon Taluka Kirana Merchants Association) यांच्या वतीने कोपरगाव शहरातील गांधी चौक ते निवाऱ्यापर्यंत काढण्यात आलेल्या १ हजार १११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची भव्य दिव्य अशा समता तिरंगा रॅलीचा शुभारंभ कोपरगाव तालुक्याचे माजी सैनिक व कोपरगाव तालुका एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष श्री.युवराज गांगवे(Shri.Yuvraj Gangwe) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात करण्यात आला. रॅलीचा शुभारंभ करण्यापूर्वी गांधी चौक येथील गांधी पुतळ्याला समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, कोपरगाव तालुक्याचे आमदार श्री.आशुतोष काळे(Mr. Ashutosh Kale) यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. समता तिरंगा रॅलीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुतर्फा गर्दी झाली होती. कोपरगाव शहरातील व्यापारी,व्यावसायिक, उद्योजक, राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तिरंगा ध्वजामध्ये झेंडू, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले. व्यापारी महासंघाचे श्री नारायण अग्रवाल(Shri Narayan Aggarwal) यांनी कोपरगाव शहरातील अहिंसा स्तंभाजवळ फटाक्यांची आतिशबाजी करत रॅलीचे स्वागत करून एक दिवाळी साजरी केली. समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी, समता नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कोपरगाव, तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे सदस्य,कोपरगाव शहरातील तमाम नागरिक या भव्य दिव्य रॅलीत सहभागी होत स्वतःच्या खांद्यावर १ हजार १११ फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेत निवाऱ्यातील स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयापर्यंत घेऊन जात रॅलीचा समारोप केला.
प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आमदार श्री.आशुतोष काळे,(Mr. Ashutosh Kale) माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे( Mrs. Snehlata Kolhe) , संजीवनी सहकारी कारखान्याचे चेअरमन श्री.विवेक कोल्हे(Mr. Vivek Kolhe), कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक श्री.वासुदेव देसले,(Mr. Vasudev Desale) कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री विजय वहाडणे,(Shri Vijay Wahadane) गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष श्री राजेश परजणे, गट विकास अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी,सहाय्यक निबंधक श्री.नामदेव ठोंबळ, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री.परेश उदावंत, लिओ क्लबचे अध्यक्ष श्री.सुमित सिनगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.समता नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन सौ श्वेता अजमेरे, संचालक श्री गुलाब शेठ अग्रवाल,श्री.रामचंद्र बागरेचा,श्री. जितूभाई शहा,श्री. गुलशन होडे,श्री. संदीप कोयटे,श्री गुलशन होडे, जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री, सुधीर डागा, सचिव श्री. प्रदीप साखरे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजकुमार बंब, कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिक कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य श्री समीर आत्तार यांनी केले तर उपस्थितांचे आभार समता पतसंस्थेचे संचालक श्री.संदीप कोयटे यांनी मानले.
COMMENTS