Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समता स्कूलची दहावीच्या उज्जवल निकालाची परंपरा कायम

कोपरगाव शहर ः सी.बी.एस.ई.चा 2023-24 चा इयत्ता 10 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी अहिल्यानगर जिल्ह्

निकृष्ट दर्जाच्या गणवेशाची उच्च न्यायालयाने घेतली दखल
श्री साईबाबांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना
महीलांनो घाबरु नका.. आपल्या सोबत जनसेवा फौंडेशन कायम सोबत आहे : सौ. शालिनीताई विखे पाटील

कोपरगाव शहर ः सी.बी.एस.ई.चा 2023-24 चा इयत्ता 10 वीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थांनी अहिल्यानगर जिल्ह्यात 8 व्यांदा बाजी मारत पुष्कर महाडिक याने 98.8 टक्के गुण मिळवुन स्कूल मध्ये प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. तर अनुष्का जपे हिने 97.06 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमाक तर व्रिष्टी कोठारी हिने 96.02 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. समता स्कूलचे या वर्षी सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग 8 व्यांदा अव्वल ठरत स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे.
समता स्कूल मधील 4 विद्यार्थी 95 टक्केच्या पुढे गुण मिळवुन उत्तीर्ण झाले आहे. त्यात पुष्कर महाडिक, अनुष्का जपे, वृष्टी कोठारी, साई देठे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर अक्षोली वाघ, गुंजन तुपे, क्रिशा खांडे, सोहम भुतडा, अनुष्का ठोळे, अंश शिंदे, तनिष्का शिंदे, माही संचेती, रौनक धाडीवाल, रुपल पाटील, ओम मेंढणे, अक्षरा अग्रवाल या विद्यार्थ्यांनी 91 ते 95 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवत यश संपादन केले आहे. 90 टक्क्यांच्या पुढे पुढे गुण मिळविणारे 24 विद्यार्थी, 80 टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणारे 55 विद्यार्थी असून  पुष्कर महाडिक याने इंग्रजी, हिंदी, समाजशास्त्र या विषयात अनुक्रमे 100 पैकी 99 गुण मिळविले आहे. अनुष्का जपे हिने देखील इंग्रजी, समाजशास्त्र विषयात 100 पैकी 99 गुण मिळविले तर सोहम भुतडा हा आयटी विषयात 100 पैकी 99 गुण मिळवत उत्तीर्ण झाला आहे. समता इंटरनॅशनल स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेली संस्था आहे.

आम्ही  विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवीत असतो. लिव्ह नो चाईल्ड बीहॅन्ड या स्कूलच्या ब्रीदवाक्याप्रमाणे समता इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील कोणताही विद्यार्थी आयुष्यात शैक्षणिकदृष्ट्या कमी पडू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन इयत्ता पहिली पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता 10 वी ला आल्यानंतर गरजेनुसार गुणवत्तेनुसार शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे स्कूल च्या ट्रस्टी स्वाती कोयटे यांनी सांगितले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या  हर्षालता शर्मा, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

समता इंटरनॅशनल स्कूल सलग 8 व्या वर्षात जिल्ह्यात अग्रगण्य राहण्याची परंपरा राखत पुनः एकदा समता पॅटर्न यशस्वी केला आहे. कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण न घेता परिस्थितीनुरूप अभ्यास करत  2023-24 मध्ये इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई.पुरस्कृत  अभ्यासक्रमांत उत्तुंग भरारी मारली असून अहिल्यानगर जिल्ह्यात उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. स्वाती कोयटे, समता इंटरनॅशनल मॅनेजिंग ट्रस्टी

COMMENTS