Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रोत्सव होणार उत्साहात

देवळाली प्रवरा ः  देवळाली प्रवरा येथील ग्रामदैवत असलेले समर्थ बाबुराव पाटील महाराज यांचा यात्रोत्सव दि. 5 ते 8 एप्रिल 2024 कालावधीत उत्साहात साजर

सुरेशनगरमध्ये मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर उत्साहात
Ahnedmagar : नगरकरांनो कोरोनाची लस न घेणाऱ्यांना रेशनही मिळणार नाही | LokNews24
गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे काम प्रगतीपथावर – आ. आशुतोष काळे

देवळाली प्रवरा ः  देवळाली प्रवरा येथील ग्रामदैवत असलेले समर्थ बाबुराव पाटील महाराज यांचा यात्रोत्सव दि. 5 ते 8 एप्रिल 2024 कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष डाँ विश्‍वासराव पाटील यांनी दिली.
                   देवळाली प्रवरा शहरातील सर्वधर्मीय मंदिर म्हणून ओळखले जाणारे समर्थ बाबुराव पाटील महाराज याञा उत्सवा करीता  पवित्र गंगाजल आणण्यासाठी भाविकांचे श्री क्षेत्र पुणतांबाकडे प्रयाण होणार आहे. दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजता शिवव्याख्याते ज्ञानेश्‍वर महाराज पठाडे यांचे कीर्तन होणार आहे. दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता ढोलताशांच्या गजरात पवित्र गंगाजलाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार असून दुपारी 4 ते 9 पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
                   पालखी पूजन सायंकाळी उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे.पालखी सोहळा महाराजांचे वंशज संजय बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून श्रीराम मंदिर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काकासाहेब चौक या मार्गावरुन  श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल. पालखी सोहळा मिरवणुकीत राज्यातील नाशिक, वैजापूर, बारामती व देवळाली प्रवरा येथिल नामांकित बॅण्ड पथक सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. रात्री शोभेच्या दारुची भव्य आतिषबाजी होणार आहे. यामध्ये संगमनेर, वांबोरी, बेलापूर येथिल नामांकित रोषणाईकार आपली कला सादर करणार आहे. 7 एप्रिल 4 वाजता कुस्त्यांच्या जंगी हगाम्याचे आयोजन करण्यात आले आहे.विजेत्या कुस्तीपट्टूसाठी चांदीची गदा  तर रात्री साडेनऊ वाजता शहरवासीयांच्या सहकार्याने व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यावतीने लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. 8 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता ’नादच खुळा’ हा सदाबहार लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा कमिटीने केले आहे.

COMMENTS