समंथा ‘या’ आजाराने त्रस्त?

Homeताज्या बातम्यामनोरंजन

समंथा ‘या’ आजाराने त्रस्त?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला( Samantha Ruth Prabhu) आरोग्याच्या विशिष्ट समस्येला सामोरे जावं लागत असल्याचं कळतंय. ती उपचारासाठी परदेशी रवाना होणार अस

आजारपणामुळे समंथा घेणार करिअरमधून ब्रेक
समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट
समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला( Samantha Ruth Prabhu) आरोग्याच्या विशिष्ट समस्येला सामोरे जावं लागत असल्याचं कळतंय. ती उपचारासाठी परदेशी रवाना होणार असल्याचंही म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथा सोशल मीडियावर सक्रिय नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिने शूटिंगमधून ब्रेक  घेतल्याचं वृत्त आहे. समंथा त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त असल्याचं म्हटलं जात आहे. या आजाराला ‘पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन’(‘Polymorphs light eruption) म्हणतात. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे त्वचेवर होतो. दरम्यान  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे.

COMMENTS