Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंब्र्यातील शाखेवरुन हायकोर्टात रंगणार ’सामना’

ठाकरे गटाकडून कायदेशीर लढाईची तयारी

मुंबई ः ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील पूर्वीची शिवसेनेच्या शाखेवर शिंदे गटाने कब्जा करत, ठाकरे गटाचे पोस्टर फाडल्यामुळे मोठा तणाव पाहायला मिळाला

बँक कर्मचार्‍यांचा संप स्थगित
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गेले अण्णा हजारेंच्या भेटीला…
प्रशासकांच्या नाकर्तेपणामुळे नगर अर्बन बँकेवर निर्बंध

मुंबई ः ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील पूर्वीची शिवसेनेच्या शाखेवर शिंदे गटाने कब्जा करत, ठाकरे गटाचे पोस्टर फाडल्यामुळे मोठा तणाव पाहायला मिळाला होता. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे गेले असता, प्रचंड तणावाच्या परिस्थितीमुळे त्यांना माघारी फिरावे लागले, मात्र मुंब्यातील या शाखेवरून हायकोर्टामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे या शाखेचा ताबा मिळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेच्या मुंब्र्यामधील एका शाखेवरुन सध्या ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेत. दोन्ही गटाकडून या शाखेवर दावा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनीही कालच्या भेटीमध्ये कोणत्याही परिस्थितीत शाखा सोडणार नसल्याचे सांगितले होते. आता या शाखेचा वाद कोर्टात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून कायदेशीर बाजू तपासून न्यायालय दाद मागतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या शाखेबाबत सर्व कागदपत्र ही आमच्याकडे असल्याचा दावाही ठाकरेंकडून करण्यात आला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये येऊन मुंब्र्यातील या शाखेला भेट देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या विनंतीनंतर त्यांनी शाखेजवळ जाणे टाळले. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी तुमची मस्ती येणार्‍या निवडणुकांमध्ये काढू, असा थेट इशाराही शिंदे गटाला दिला.

COMMENTS