कोपरगाव प्रतिनिधी : स्थानिक के.जे. सोमैया (वरिष्ठ)व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महान स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निम
कोपरगाव प्रतिनिधी : स्थानिक के.जे. सोमैया (वरिष्ठ)व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महान स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वतंत्र्य चळवळीचे पहिले नेते, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, तज्ञ वकील अशी ओळख असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन तसेच थोर समाज सुधारक, लोककवी, लेखक, शाहिरी व पोवाडे यातून समाज प्रबोधनाचे काम करणारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव(Dr. BS Yadav) यांच्या हस्ते दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रो.विलास आवारी,(Vilas Awari) डॉ.विजय ठाणगे,(Dr. Vijay Thange) प्रो.बी.बी.भोसले,(Prof. B.B. Bhosale) डॉ.बाबासाहेब गव्हाणे,(Dr. Babasaheb Gavane) डॉ.बी.एस. गायकवाड,(Dr. B.S. Gaikwad) डॉ.अभिजीत नाईकवाडे(Dr. Abhijit Naikwade) यांच्या समवेत बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS