Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खानला पुन्हा आली जीवे मारण्याची धमकी

मुंबई प्रतिनिधी -  अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला आणि

सलमानच्या घरावर गोळीबार करणार्‍या आरोपीची आत्महत्या
लॉरेन्स बिष्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी
चिरंजीवीच्या ‘गॉड फादर’ मध्ये सलमानची जबरदस्त एण्ट्री.

मुंबई प्रतिनिधी –  अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला आणि सलमानला मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव रॉकी भाई असं सांगितलं. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्या रॉकी भाईने पोलीस कंट्रोलला सांगितलं की तो जोधपूरचा राहणारा आहे आणि तो एक गोरक्षक आहे. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा फोन आला होता.

सलमानला यापूर्वीही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. म्हणूनच खबरदारीसाठी त्याने नुकतंच स्वतःसाठी एक संरक्षण कवच अर्थात बुलेट प्रूफ कारची खरेदी केली आहे. जेणेकरून घराबाहेर पडल्यानंतर काही घटना घडलीच तर या कारद्वारे सलमान स्वतःचा बचाव करू शकेल. सलमानने निसान पेट्रोल एसयूव्ही कार स्वतःच्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. सध्या ही कार भारतीय बाजारपेठेत लाँचदेखील झाली नाहीये. पण वारंवार येणाऱ्या धमक्यांनंतर सलमानने ही कार खरेदी केली आहे.

COMMENTS