Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीबीएसई शाळांना बोगस ना हरकत प्रमाणपत्रांची विक्री

पुण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल, 3 शाळांची चौकशी सुरू

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात सीबीएसई शाळांना राज्य शासनाचे बोगस ना हरकरत प्रमाणपत्र (एनओसी) विकणारी टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली

आकाश आनंद मायावतींचा उत्तराधिकारी
विकासरत्न पुरस्काराने श्वेता घाडगे यांचा सन्मान
…तर सोमय्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू | LOKNews24

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यात सीबीएसई शाळांना राज्य शासनाचे बोगस ना हरकरत प्रमाणपत्र (एनओसी) विकणारी टोळी कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 3 शाळांना असे बोगस प्रमाणपत्र विकणार्‍या अज्ञातावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी दिली आहे.

 पुण्यातील एम. पी. इंटरनॅशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज (शिवाजीनगर), क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कुल अँन्ड ज्युनियर कॉलेज आणि नमो आर. आय. एम. एस. इंटरनॅशनल स्कुल अँन्ड ज्युनियर कॉलेज, अशी गुन्हा घडलेल्या शाळांची नावे आहेत. पुणे हे शिक्षणाचे माहेर घर समजले जाते. अनेक शाळा संस्था पुण्यात आहेत. यात सीबीएसई शाळा देखील आहेत. या शाळांना राज्य शासनाची मान्यता घेणे गरजेचे असते. त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिली जाते. हे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी पुण्यात कार्यरत झाली होती. तब्बल 12 लाख रुपयांत हे प्रमाणपत्र शाळांना दिले जात होते. यासाठी मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांच्या बनावट सह्यांचा वापर करण्यात आला आहे. शिक्षण विभागाला याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. पुणे जिल्हा परिषदेमार्फत या प्रकरणाची चौकशी सूरु आहे. तब्बल तीन शाळांची चौकशी सुरू आहे. हा घोटाळा मोठा असून यात अनेक मोठ्या माशांचा हात असल्याचे बोलले जात आहे. सध्या या प्रकरणी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचा यात समावेश आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार एम. पी. इंटरनॅशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज, शिवाजीनगर, क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज आणि नमो आर आय एम एस इंटरनॅशनल स्कुल एन्ड ज्युनियर कॉलेज या शाळांची चौकशी सुरू होती. या शाळा तपासणीत दोषी आढळल्याने पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात सदर प्रमाणपत्र देणार्‍या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS