Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी वसाहत भागात साकुरी ग्रामपंचायतीने कचरा टाकू नये

स्थानिक नागरिकांची मागणी कचर्‍यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

राहाता ः साकुरी हद्दीतील गोदावरी वसाहतीला लागून साकुरी ग्रामपंचायत कचर्‍याचे ढीग टाकत आहे. कचरा तेथे टाकू नये अशी मागणी तेथील रहिवाश्यानी केली आह

अल्टो कार व एसटी बस यांचा अपघातात एक जणांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी | ब्रेकिंग | LokNews24
नगर अर्बनच्या मतदारयादीवरील हरकतींवर उद्या होणार सुनावणी
अबब…! दोन महिन्यात पुल खचला

राहाता ः साकुरी हद्दीतील गोदावरी वसाहतीला लागून साकुरी ग्रामपंचायत कचर्‍याचे ढीग टाकत आहे. कचरा तेथे टाकू नये अशी मागणी तेथील रहिवाश्यानी केली आहे. तालुक्यातील साकुरी गावातील असलेल्या गोदावरी वसाहतीच्या शेजारी महामार्गाच्या बाजूला ग्रामपंचायत ने साठवलेल्या कचर्‍याला सकाळच्या वेळी तेथील कचरा पेटून दिला जातो. त्यामुळे त्या भागात दुर्गंधी, तसेच धुराचे प्रमाण वाढते. त्यातून प्रदूषण वाढते. गोदावरी वसाहत या ठिकाणी मोठी लोक वस्ती असल्याने तेथील कचरा हा महामार्ग जवळ असलेल्या जागेत टाकला जातो.
हा कचरा कोणीतरी पेटून दिल्याने मोठ-मोठे धुराचे लोट निघत असतत. या पेटून दिलेल्या कचर्‍याच्या दुर्गंधीयुक्त वास येत असून या ठिकाणी मोठी लोकवस्ती असल्याने येथील स्थानिक रहिवासी यांनाही धुराचा व दुर्गंधीयुक्त वासाचा त्रास होत असल्याचे नागरिक खाजगीत बोलले जात आहे. तर मागे ही काही दिवसापूर्वी अशाच पद्धतीने कचरा जास्त प्रमाणात झाल्यावर या ठिकाणी साठवून ठेवलेला कचरा पेटून देण्याचे काम करण्यात येते. हा कचरा जवळपास एक आठवडाभर जळत असताना या कचर्‍यातून धूर व उग्र स्वरूपाचा वास येत होता. तर मागील प्रमाणेच दिनांक 19 जून रोजी पुन्हा त्याच ठिकाणी कचरा साठवून पेटवून देण्याचे काम त्या ठिकाणी केले. पेटून दिलेला कचरा हा महामार्ग लगत असल्याने अनेक वाहने महामार्गावरून जात असतात त्यांना या धुराचा व उग्र वासाचा सामना करावा लागत आहे. यामुळे येथील स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने ग्रामपंचायतीने हा कचरा दुसर्‍या ठिकाणी टाकून याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची मागणी केली जात आहे. सध्या पावसाळा असल्याने साठवलेल्या कचर्‍यातून रोगराई पसरणार नाही याचीही ग्रामपंचायतने दक्षता घेणे गरजेचे आहे. नाहीतर यातूनच साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे, याची ग्रामपंचायत ने दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

COMMENTS