Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेनबो स्कूलचा विद्यार्थी साईश गोंदकर याची सातासमुद्रापार भरारी

कोपरगाव तालुका ः जिद्द आणि कष्टाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीचेही बुरुज ढासाळतात हे आपल्या अलौकिक कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे कोपरगाव येथील

शेवगावमध्ये 23 नोव्हेंबरला मनोज जरांगे यांची विराट सभा
कोपरगावातील जनावरे बाजार सोमवारी बंद
महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री

कोपरगाव तालुका ः जिद्द आणि कष्टाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीचेही बुरुज ढासाळतात हे आपल्या अलौकिक कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे कोपरगाव येथील शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी साईश विनोद गोंदकर याने. नुकतीच साईश याची अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस या अग्रमानांकित विद्यापीठात बारावीनंतर कॉम्प्युटर इंजीनियरिंग या अभ्यासक्रमासाठी निवड होऊन त्याला तेथील शिष्यवृत्ती मिळाली आहे.
         आज जागतिकीकरणाच्या युगाने औद्योगिक उद्योगासाठी नवनवीन आव्हाने, त्याचबरोबर नवनव्या संधी उपलब्ध केलेल्या आहेत. ज्यांनी ही आव्हाने पेलून मिळालेल्या संधीचे सोने केले, तेच यशोशिखर गाठतात. त्यापैकीच साईश गोंदकर  हा हरहुन्नरी विद्यार्थी मुळातच अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेला, चौकस व जिज्ञासू वृत्तीचा आणि समाजभिमुख काम करण्याची अंतरीक उर्मी असलेल्या साईशला खर्‍या अर्थाने पैलू पाडण्याचे काम केले, ते रेनबो शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंदांनी सामाजिक बांधिलकी जपणार्‍या साईशने कोरोना काळामध्ये नीड फॉर नीडी प्रकल्प राबवून अनेक गरजू व्यक्तींना, मुलांना विविध माध्यमातून मदत करून आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले. आज रेनबो शैक्षणिक संकुलात साईशच्या या उज्वल यशाचा कौतुक सोहळा त्याच्या पालकांसह आयोजित केला होता. याप्रसंगी  संस्थेचे सचिव  संजय नागरे, कार्यकारी संचालक आकाश नागरे, शैक्षणिक संचालक  नानासाहेब दवंगे, शैक्षणिक सल्लागार अविनाश शिरसाठ, उपप्राचार्य निलेश औताडे, कार्यालयीन प्रमुख  रवींद्र साबळे, सर्व  शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. साईशने केलेल्या नेत्र दीपक कामगिरीचे कौतुक करीत आकाशजी नागरे यांनी साईश व त्याच्या पालकांचा व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना साईश व त्याचे पालक विनोदजी गोंदकर यांनी सांगितले की, साईशने मिळवलेल्या या उत्तुंग यशात रेनबो इंटरनॅशनल स्कूलचा सिंहाचा वाटा आहे. साईश खर्‍या अर्थाने घडला व घडवला गेला, तो रेनबो शैक्षणिक संकुलातील उच्च गुणवत्तापूर्ण वातावरणात. आणि याचा आम्हाला खरोखर सार्थ अभिमान आहे. साईशच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष  कांतीलाल अग्रवाल, सचिव  संजय नागरे, विश्‍वस्त  मनोज अग्रवाल, आनंद दगडे, सौ. वनिता नागरे आदि पदाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS