Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाविक भक्तांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थान सज्ज!

शिर्डी : नाताळ या सणाच्या निमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेत गतवर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीमध्ये भाविक भक्तांची आणि पर्यटकांची मोठ्या प्

शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!
शिर्डी येथील क्रांती युवक मंडळाचे अभिनव पद्धतीने गणेश विसर्जन..
शिर्डीत रेड अलर्ट ! दहशतवादी कारवाईचा धोका.

शिर्डी : नाताळ या सणाच्या निमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा फायदा घेत गतवर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीमध्ये भाविक भक्तांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्यामुळे शिर्डीच्या साई संस्थान प्रशासनाने भाविक भक्तांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी ओळखले जाणारे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गाडीलकर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण देशभरातून आणि देशाबाहेरून शिर्डीला भेट देणार्या पर्यटकांना आणि भाविक भक्तांना सोई सुविधा देण्यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये, यासाठी प्रशासनाची सर्व अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना सख्त आदेश दिलेले आहेत.
भाविक भक्तांसाठी संस्थान प्रशासनानं भाविक भक्तांसाठी अतिशय वाजवी दरामध्ये निवास व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर साईबाबा संस्थान यांच्या तीन भोजनगृहामध्ये दिवसभर मोफत अन्नदान केले जाते. त्याचबरोबर संस्थांनने दोन रुपयात चहा आणि तीन रुपयात कॉफी आणि दूध उपलब्ध करून दिलेला आहे. मंदिरापासून तर प्रसादालयापर्यंत जाण्यासाठी भक्तांसाठी आराम बसेसची सुविधा उपलब्ध केलेली आहे. साईंच्या दर्शनासाठी यापूर्वी असलेले अनेक कडक नियम सध्या शिथिल करण्यात आलेले आहेत. भाविकांना देण्यात येणार्या सर्वच प्रकारच्या सोयी सुविधांमध्ये तसेच स्वच्छतेबाबत कोणतीही कसर राहू नये किंवा दिरंगाई होऊ नये म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर हे स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. स्वच्छता विभाग, वीजपुरवठा विभाग, पाणीपुरवठा व आरोग्य विभागातील अधिकार्यांच्या बैठका घेऊन सर्वांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गोरक्ष गाडीलकर हे शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलून आल्यापासून संस्थानच्या कारभारात सुसूत्रता आणि पारदर्शकते बरोबरच गतिमानता आलेली आहे. अयोध्या येथे राममंदिर निर्माणानंतर देशातील भाविक भक्तांचा मोठा ओघ हा तिकडे वळालेला आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात शिर्डी येथे येणार्या भाविक भक्तांची संख्या काही प्रमाणात घटकांना दिसून येत आहे. शिर्डी मधील काही व्यापार्यांशी चर्चा केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या त्यात ही एक महत्त्वाची बाब आहे. स्वतःच्या वाहनाने शिर्डीला येणार्या भाविक भक्तांना गाड्या अडवून पोलिसांचे त्रास देणे असो किंवा पार्किंगच्या नावाखाली नगरपरिषद प्रशासन करत असलेली भावीक भक्तांची लूट असो. या कारणामुळे अनेक पर्यटक आणि भाविक भक्त शिर्डीला भेट देण्याचे टाळत असल्याची येथे चर्चा आहे. दुसरी बाब म्हणजे गोव्यात नवीन आलेल्या भाजपा सरकारनं त्या राज्यात येणार्या पर्यटकांसाठी अनेक नियम शिथिल करून खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध केल्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक शिर्डी ऐवजी गोव्याला अधिक पसंती देऊ लागले आहेत. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर शिर्डीला भेट देणार्या भाविक भक्तांना आणि पर्यटकांना कोणत्याही प्रकारची तोशिस स लागू नये, म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे स्वतः काळजी घेताना दिसून येत आहे. द्वारावती भक्त निवासासमोरील प्रशस्त उद्यान भावी भक्तांच्या आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले आहे. शिर्डीला भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा उद्यानातून फेरफटका मारतोच. त्यांच्या योग्य नियोजनामुळेच शिर्डीकर आणि भाविक भक्त यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असले तरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी दिघे यांनीही आपल्या प्रशासनात सुधारणा करून भाविक भक्तांच्या आणि पर्यटकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे येथे बोलले जात आहे. असे झाले तरच भारतभरातून शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी येणारा भक्त पुन्हा पुन्हा आनंदाने आणि समाधानाने येऊ शकेल आणि येथे वास्तव्य करू शकेल.

COMMENTS