Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सई ताम्हणकरनं मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर

मुंबई प्रतिनिधी - सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मराठीसह हिंदीतही आपला ठसा उमटवला आहे. सई खूप वर्षापासून

शरद पवारांच्या सर्वात निकटवर्तीय मित्राचे निधन… घरी भेट देत वाहिली श्रद्धांजली (Video)
जिल्हा भाजपा कडून राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
खासदार संभाजीराजेंना अडवल्या प्रकरणी, तुळजापूरात उद्या बंदची हाक | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मराठीसह हिंदीतही आपला ठसा उमटवला आहे. सई खूप वर्षापासून इंडस्ट्रीत काम करतेय. खूप मेहनतीनंतर आता सईने मुंबईत तिचं स्वतःचं घर खरेदी केलं आहे. सई ताम्हणकरचा सांगली ते मुंबई हा प्रवास सर्वांनाच माहित आहे. सईने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अभिनेत्रीने आता मुंबईत तिचं स्वतः चं घर घेतलं आहे. आपण नवीन घरात गेलो तरीही जुन्या आठवणी या सोबतच असतात. असंच काहीसं सईच्याबाबतीत झालंय. सई ताम्हणकरने तिच्या जुन्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सई ताम्हणकरने नुकतंच मुंबईत तिचं पहिलं घर घेतलं आहे. यावेळी जुन्या घरातून शिफ्ट होतानाचा व्हिडिओ सईने शेअर केला आहे. व्हिडिओत सई तिच्या वस्तूंची पॅकिंग करताना दिसत आहे. सई भावूक झालेली दिसत आहे. “मला खरंच अजूनही या घरातून जावंसं वाटत नाहीये. मला माहितीये की, ते घरं खूप छान आणि मोठं आहे. परंतु अशा काही गोष्टी असतात ज्या कधीच सुटत नाही. हे घर त्यातीलच एक आहे. या घराने खूप काही पाहिलंय. खूप काही शिकवलंय. या घराने मला खूप काही दिलंय. असं म्हणत सई भावूक झाल्याची दिसत आहे.सईने तिच्या जुन्या घराविषयी भावना शेअर केल्या आहेत. ‘द इलेव्हेन्थ प्लेस (अकरावी जागा). पुन्हा एकदा घाबरत आणि उत्साहात नवीन घरात पाऊल ठेवले. माझं एक स्वपन पूर्ण झालं आहे. माझं मुंबईतील पहिलं घरं. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. एक जागा ज्याला घर म्हणू शकते. जिथे नवीन आठवणी विणल्या जातील. या आनंदाच्या काळात एक कडू आठवण, एके काळी जे माझे घर होते. त्याला निरोप देताना, माझ्या घरच्या भितींना, माझा कम्फर्ट झोन सोडत, मी ही जागा सोडत आहे. मी प्रत्येक गोष्ट पॅक करताना घरातील आठवणी जाग्या होतात. हसण्याच्या, बोलण्याच्या, इथे घालवलेल्या प्रत्येक वेळेची आठवण येते. परंतु यापुढे मी आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरवात करत असताना, माझं मनं भरु येत आहे. या घराच्या आठवणी, शिकवणी सोबत घेऊन नवीन घरात, नवीन स्वप्नांसोबत पाऊल ठेवत आहे. मी या घराला कृतज्ञेने निरोप देत आहे.

COMMENTS