Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री व्हॅली स्कूल किलबिलाने बहरली

अकोले ः सह्याद्री व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाल चिमुकल्यांच्या पदस्पर्शाने व किलबिलाने शाळेचा परिसर पुन्हा नव्या हर्षाने बहरून गेला. शाळेच

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला 200 जागांवर आघाडी
मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्काराचा इशारा
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताच्या सचिन भट्टड यांची निवड

अकोले ः सह्याद्री व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाल चिमुकल्यांच्या पदस्पर्शाने व किलबिलाने शाळेचा परिसर पुन्हा नव्या हर्षाने बहरून गेला. शाळेच्या गेटवर आकर्षक काढलेली रांगोळी, केळीच्या पानांचे तोरण, फुगे व फुलांनी सजवलेला परिसर तसेच सेल्फी पॉइंट वर्गातल्या भिंतीवर केलेली आरस या गोष्टींनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष वेधून घेतले.
दीड ते दोन महिन्याच्या कालावधी नंतर शनिवारी शाळेच्या घंटा वाजल्या, शाळेचा आजचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, आनंद दिसत होता. शाळेचा पहिला दिवस काही पालक मुलाला चालत सोडायला आले होते, तर काही मोटार सायकलने, काहींनी तर चारचाकी आणली होती. यावेळी मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता, शाळेत येताना नवा गणवेश, नवे दप्तर, नवे शूज परिधान केले होते. नवा वर्ग कसा असेल, नवीन मित्र मैत्रिणींची ओळख, मैत्री होणार, वर्ग शिक्षक कोण असणार याची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होती. दीड ते दोन महिने शाळेचा परिसर ओस पडला होता, शाळेकडील रस्ते सामसूम होते, आता शाळेला सुरुवात झाल्याने शाळेचा परिसरात पुन्हा विद्यार्थीची किलबिल ऐकू यायला लागली, तर रस्त्यावर विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसू लागली तर  रजेवर गेलेल्या स्कुल बस रस्त्यावर पुन्हा धावू लागल्या. शिक्षकांनी स्वागत करत विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेचे पूजन केले तसेच यावेळी नवगातांच्या हातचे ठसे घेत एक आठवणी जपून ठेवल्या. विद्यार्थी आनंदाने बागडत होती. आपलं मन मोकळं करत विविध मनोरंजनपर खेळ खेळण्यात आले. तसेच गाण्यांच्या तालावर त्यांची पावले थिरकली यावेळी शाळेच्या प्राचार्या स्मिता पराड, ज्येष्ठ शिक्षिका संगीता बारेकर, कलाशिक्षक आशिष हंगेकर, दीप्ती लहामगे, श्रद्धा पाटील, मनीषा सोनवणे, अर्चना साबळे, वंदना ढगे, योगिता कहाने, मुक्ता वाकचौरे, नंदकिशोर क्षिरसागर, आदींनी प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

COMMENTS