Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री खरेदी-विक्री संघ खत कारखाना उभारणार : सत्यजित देशमुख

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री खरेदी विक्री संघ सेंद्रीय खत निर्मिती व रासायनिक खत निर्मिती कारखान्याची उभारणी करणार असून, संघासाठी मोठे गोडाऊन

ना. रामराजेंवर टिका करुन दुकान चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न : प्रितसिंह खानविलकर
देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत
सांगली जिल्ह्यातून राज्यात गांजासह अंमली पदार्थ पुरवण्याचे काम

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री खरेदी विक्री संघ सेंद्रीय खत निर्मिती व रासायनिक खत निर्मिती कारखान्याची उभारणी करणार असून, संघासाठी मोठे गोडाऊन उभारणी करणे ही कामे प्राधान्याने केली जाणार आहेत, असे प्रतिपादन भाजपा नेते, सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
सह्याद्री खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष संपतराव देशमुख, ज्येष्ठ नेते फत्तेसिंग देशमुख, संघाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, रणजितसिंह नाईक, सुजित देशमुख, सम्राट शिंदे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक के. डी. पाटील यांनी केले. अहवाल वाचन शिंदे यांनी केले.
सत्यजित देशमुख म्हणाले, सह्याद्री संघाची वाटचाल आदर्शवत सुरु असून जिल्ह्यात सर्वात प्रगतशिल संघ म्हणून नोद आहे. स्व. शिवाजीराव देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या हिताचा दृष्टीकोण ठेवून संघाची उभारणी केली आहे. त्याचा आज फायदा शेतकर्‍यांना होत आहे.
शेती माल उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेत माल प्रक्रियेवर उद्योग उभारणी साठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करत आहे. साखर कारखानदारांचा मोठ्या प्रमाणात शासकीय कर केंद्र सरकारने माफ केला. याचा फायदा शेतकर्‍यांना वाढीव ऊस दर देण्यासाठी होणार आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेतीतील बदल आमलात आणावेत, असे आवाहन देशमुख यांनी केले.
संपतराव देशमुख म्हणाले, सहकार विभागाचे नियम सतत बदलत आहेत. त्यामुळे संघाचा शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे. संघाने लोकांच्या सोयीसाठी पाच नवनवीन शाखा उभारल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना जाग्यावर चांगल्या, दर्जदार खत, बियाणे संघ देत आहेत. यापुढील नवीन उद्योग उभारणी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी प्रदीप कदम, सतीश सुतार, शांताराम जाधव, शहाजी बोबडे, मानसिंग पाटील, राजाराम मस्के, मिलिंद धर्माधिकारी, नारायण खोत, नथुराम खोत, मनोहर चिचोलकर, संभाजी नलवडे, सुनिल पाटील,यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद, उपस्थित होते.

COMMENTS