Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारमहर्षी नागवडे कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन उत्साहात

श्रीगोंदा प्रतिनिधी- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व अनेक समस्यांचा सामना करत स्वर्गीय श

वाहनचोरी करणार्‍या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक- नंदकुमार गव्हाणे
संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळी महोत्सवाचे आयोजन

श्रीगोंदा प्रतिनिधी- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व अनेक समस्यांचा सामना करत स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने व चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करीत असून यंदा गळीत हंगाम आव्हानात्मक असला तरी सभासद शेतकरी व कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यांच्या समन्वयाने गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी केले आहे.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 -24 या 49 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमीचे शुभ मुहूर्तावर अतिशय साध्या पद्धतीने संपन्न करण्यात आला. युवा नेते पृथ्वीराज नागवडे कारखान्याचे संचालक प्रा. सुरेश रसाळ व सौ. सारिका रसाळ तसेच विठ्ठलराव जंगले व सौ. कल्पनाताई जंगले यांच्या शुभहस्ते बॉयलरची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी भोस पुढे म्हणाले की, स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी महत्प्रयासाने उभी केलेली व जीवापाड सांभाळलेली तालुक्याची वैभव लक्ष्मी भविष्य काळातही हजारो लोकांची जीवनदायिनी ठरणार असल्यामुळे कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ स्व. बापूंच्या विचारांचा वारसा घेऊन या कारखान्याचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाष काका शिंदे, अनिल मामा पाचपुते, श्रीनिवास घाटगे, राकेश पाचपुते, जीवन शिपलकर, विश्‍वनाथ गिरमकर,  सावता हिरवे, बंडू जगताप, योगेश भोईटे,  शरद जगताप, लक्ष्मणराव रायकर,  भाऊसाहेब बरकडे, भीमराव लबडे,  मारुती पाचपुते, संदीप औटी कार्यकारी संचालक रमाकांत नाईक तसेच कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कामगार उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज नागवडे म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यातील सभासद शेतकरी व कामगार हा अतिशय सुज्ञ,  विचारी व संस्कारी आहे. स्व. बापूंनी अहोरात्र परिश्रम घेऊन ही वास्तू उभी केली व नावारूपास आणली.  हे करत असताना तालुक्यातील आम जनतेने, सभासद, शेतकर्‍यांनी व कामगारांनी फार मोठी साथ त्यांना दिली. भविष्यकाळात आपल्यासमोर मोठी आव्हाने असल्यामुळे सर्वांनी एक दिलाने काम करून कारखान्याची वाटचाल यशस्वी करावी लागणार आहे.  कारखान्याच्या दृष्टीने कामगार हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्यांच्यावर विशेष जबाबदारी आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी प्रास्ताविकात कारखान्याने केलेल्या वाटचालीचा आढावा घेऊन सर्व यंत्रणा गाळपणासाठी सज्ज असल्याचे सांगितले.  स्वागत व सूत्रसंचालन करताना  ज्येष्ठ संचालक सुभाष काका शिंदे यांनी स्व. बापूंच्या काही आठवणी सांगितल्या.  संचालक योगेश भोईटे यांनी आभार मानले.

COMMENTS