Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सागर निवासस्थानी खलबते

कायदेशीर लढाईसह मंत्रिपदासंदर्भात झाली चर्चा

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते सत्तेत सहभागी झाल्यानंतर सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य

माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
कोणती भाकरी फिरवायची ते पवारांनाच विचारा ः मुख्यमंत्री शिंदे
कुटुंब नियोजन आणि धर्माचे प्रयोजन

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते सत्तेत सहभागी झाल्यानंतर सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत भविष्यातील संकटांवर खलबते करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर होणार्‍या कायदेशीर कारवाईला सामोरे कसे जाणार? तसेच नवीन मंत्र्यांचे खातेवाटप, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. काही वेळातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील सागर या बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेबाबत कायदेशीर प्रक्रियेवर सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते देण्यात यावे, यावर देखील या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मंत्रालयात केबिन देण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार हे आधीच्या सरकारमध्ये म्हणजेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात येईल का? असा प्रश्‍न उपस्थित होतोय. सध्या अर्थ मंत्रालय देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहत आहेत. मात्र आता ते अजित पवारांकडे एवढे महत्त्वाचे खाते सोपवणार का? त्यांचा अर्थमंत्री पदाचा अनुभव पाहता त्यांच्याकडे अर्थ खात देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS