Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे वाहतूक पोलिसांकडून ’सुरक्षेची राखी’

पुणे : रक्षाबंधन या सणाला रक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आजचा दिवस भाऊ बहिणीसाठी खास मानला जातो. बहिणीच्या रक्षणाचे वचन देत भाऊ बहिणीकडून रा

भिंगार कॅम्प पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 20 कोटी रुपयांचे कोकेन जप्त
डॉ. प्रतिभा जाधव यांच्या कथासंग्रहास पद्मगंगा फौंडेशनचा पुरस्कार प्रदान 

पुणे : रक्षाबंधन या सणाला रक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आजचा दिवस भाऊ बहिणीसाठी खास मानला जातो. बहिणीच्या रक्षणाचे वचन देत भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो. याच सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. वाहतूक नियम मोडणार्‍यांना दरडवण्याऐवजी सोमवारी महिला पोलिसांनी सुरक्षेची राखी बांधली आहे.
पुण्यात सध्या वाढती वाहतूक आणि वाहतुकीचे नियम तोडणार यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणार्‍या अपघातांचे प्रमाणही वाढत असताना ट्रॅफिक पोलिसांनी राखी पौर्णिमेचा निमित्त सादर एक अनोखा उपक्रम सुरू केला. रक्षाबंधन सणाला भाऊ आपल्या बहिणीला संरक्षणाचे वचन देतो आणि बहीण भावाला राखी बांधते. याच सांस्कृतिक परंपरेशी सीट बेल्ट न घालणार्‍यांसाठी जनजागृतीची सांगड घालत पुणे वाहतूक पोलिसांनी भावांना सुरक्षेची राखी बांधली. सध्या शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांची संख्या वाढली असून नियमांचे वारंवार उल्लंघन होताना दिसते. यासाठी पुणे ट्रॅफिक पोलिसांनी रक्षाबंधनाचे निमित्त साधत अनोखी शक्कल लढवली आहे.  पुण्यातील महिला वाहतूक पोलिसांनी सीट बेल्ट न घालणार्‍यांना दरडवण्याऐवजी आता सुरक्षेची राखीच बांधली आहे.

COMMENTS