पीक संरक्षण उत्पादनांचा सुरक्षीत वापर पिकांच्या व शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाचा : कुलगुरु डॉ.पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीक संरक्षण उत्पादनांचा सुरक्षीत वापर पिकांच्या व शेतकर्यांच्या दृष्टीने महत्वाचा : कुलगुरु डॉ.पाटील

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जवळजवळ प्रत्येक पिकावर संशोधन करणारे संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. विद्याप

15% लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित : आ.काळे
जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी
कांद्याला एक रुपये भाव मिळाल्याने शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात जवळजवळ प्रत्येक पिकावर संशोधन करणारे संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ऊस, द्राक्ष व डाळिंब या महत्वाच्या फळपिकांखाली मोठे क्षेत्र आहे. कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना कोरोमंडल कंपनीबरोबर झालेल्या सामजंस्य कराराचा फायदा होणार आहे. पिकांचे रोग किडींपासून संरक्षण होण्याबरोबरच पीक संरक्षण उत्पादनांचा सुरक्षीत वापर पिकांच्या दृष्टीने आणि शेतकर्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. 

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व सिकंदराबाद येथील कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या विद्यमाने एक दिवसीय ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. कॅम्पस ते कार्पोरेट या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या प्रशिक्षणाचा विषय पिकांच्या संरक्षणासाठी कृषि रसायनांचा वापर व हाताळणी करताना घ्यावयाची काळजी हा होता. या प्रसंगी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, वनस्पती रोगशास्त्र व कृषि अनुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. तानाजी नरुटे, रेग्युलेटरी अफेअरचे उपाध्यक्ष डॉ. राजुल इडोलीया, रेग्युलेटरी अफेअरचे वरिष्ठ महाव्यवस्थापक व प्रमुख डॉ. ए. कप्पूसामी व कोरोमंडल कंपनीचे मॅनेजर डॉ. प्रशांत हरी उपस्थित होते.   डॉ. शरद गडाख यांनी या सामंजस्य करारामध्ये झालेल्या शिक्षण, संशोधन व विस्ताराबाबतचे मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद रसाळ यांनी प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात डॉ. राजुल इडोलीया यांनी कोरोमंडल आंतरराष्ट्रीय कंपनी व किटकनाशकांचा जबाबदारीने वापर या विषयावर तसेच डॉ. कप्पूसामी यांनी भारतीय पीक संरक्षण उद्योग या विषयावर तर डॉ. तानाजी नरुटे यांनी पिकांच्या रोग व्यवस्थापनातील नविन धोरणे या विषयावर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात दहा प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन डॉ. तानाजी नरुटे यांनी तर आभार डॉ. अण्णासाहेब नवले यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 150 पेक्षा जास्त विद्यार्थी, शास्त्रज्ञ व प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

COMMENTS